Posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

Image
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप* शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार* इंदापूर - पुणे, : दि. २६: शेतीत प्रगती साधण्याच्यादृष्टीने शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे; शेतकरी संशोधक असला पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५'  च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बाबासाहेब देशमुख, उप विभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके, आजी, माजी संचालक मंडळ आदी उपस्थित होते.  यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अतिशय नेत्रदीपक  कृषी प्रदर्शन, जनावरे, घोडेबाजार व डॉग शो आयोजित केला. यामुळे शे...

श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या शुभहस्ते प्रा. सोमनाथ माने सर यांना राज्यस्तरीय महात्मा फुले व सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला.

Image
श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या शुभहस्ते प्रा. सोमनाथ माने सर यांना राज्यस्तरीय महात्मा फुले व सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला.  इंदापूर : इंदापूर येथील राजमाता अहिल्याबाई होळकर निवासी महाविद्यालय इंदापूर येथील प्राध्यापक सोमनाथ माने सर यांना नुकतेच पुणे येथे झालेल्या महात्मा ज्योतिराव फुले इतिहास अकॅडमी यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमाची व राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाची भूमिका ही डॉ. श्रीमंत कोकाटे सर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलेली आहे. आपल्या देशात सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घालणाऱ्या महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रति असलेल्या कृतर्थ भावनेने त्यांच्या नावाने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार ही भूमिका थोर इतिहास तज्ञ डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी मांडली. तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार.दत्तात्रय सावंत  आय.आर.एस  विपुल वाघमारे  गणेश माने देशमुख  चेअरमन जय हिंद सहकारी साखर कारखाना.शिवाजी खांडेकर र...

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*

Image
*अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व* इंदापूर :  पुणे जिल्हा परिषद सदस्या, एस बी पाटील शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे  या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (जागतिक गुंतवणूक परिषद)  दावोस येथे होणाऱ्या वार्षिक २०२५ च्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. २० ते २४ जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंड येथील दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीसाठी त्या उपस्थित राहणार आहेत.        जागतिक व्यापार, व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून जगाच्या आणि एखाद्या प्रदेशाच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं 1971 साली WEF ची स्थापना झाली होती. दरवर्षी या संस्थेतर्फे स्वित्झर्लंडच्या दावोस या नयनरम्य ठिकाणी एका परिषदेचं आयोजन केलं जातं. एस.बी. पाटील शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षा, ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या (इस्मा) कायदेशीर उपसमितीच्या मा.सहअध्यक्ष व इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन लि.च्या संचालिका अंकिता पाटील ठाकरे आहेत.   अंकिता पाटील ठाकरे या उच्च व...

एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

Image
*एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन.                 इंदापूर : पळसदेव* दि.18जाने 2025 रोजी गव्हर्नमेंट हॉस्पिटल पळसदेव मधून आशाताई यांचे मार्फत एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये सहावी ते बारावी मधील सर्व किशोवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.       आशाताई सुनंदा कांबळे यांनी मुलींना मासिक पाळी , स्वच्छता याबद्दल मार्गदर्शन केले तसेच शाळेतील सहशिक्षिका सौ विद्या पोटे मॅडम यांनी मुलींमधील होणारे बदल, पौगंडावस्थेतील बदल, स्वच्छता, सोशल मीडियाचा अतिवापर याबद्दल उत्कृष्ट माहिती दिली कार्यक्रमासाठी प्राचार्या सौ वंदना बनसुडे, विभाग प्रमुख सौ सिमा बाराते, समन्वयक सौ सुवर्णा वाघमोडे आशाताई राणी बनसुडे, केशर वाघमोडे, शोभा ढावरे, सहशिक्षिका, सुजाता ढवळे,सीमा आदलिंग यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला

वरकुटे खुर्दच्या आखाड्यात प्रेक्षणीय कुस्त्या**रविराज चव्हाण ची सत्पाल सोनटक्के वर मात*

Image
*वरकुटे खुर्दच्या आखाड्यात प्रेक्षणीय कुस्त्या* *रविराज चव्हाण ची सत्पाल सोनटक्के वर मात* *इंदापूर :वरकुटे खुर्द(ता. इंदापूर)येथील पीरसाहेब यात्रेनिमित्त गुरुवारी झालेल्या कुस्ती आखाड्यात दोन लाख अकरा हजार इनामाच्या कुस्तीत आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र,पुणे च्या रविराज चव्हाण याने शिवनेरी तालीम,अकलूज च्या सत्पाल सोनटक्के चा एकेरी कस चढवून चिटपट कुस्ती करून विजय मिळवला.विजयी रविराज चव्हाण याला दूधगंगा दुध संघाचे माजी अध्यक्ष नवनाथ पिराजी ठवरे-पाटील यांचे स्मरणार्थ सोमनाथ ठवरे यांचेकडून पीरसाहेब केसरी किताब व गदा भेट देण्यात आली.*           *हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेच्या ग्रामदैवत पीरसाहेब यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात सात तास चाललेल्या आखाड्यात तीनशे प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या.तेजस शिंदे,स्वप्नील दगडे,सत्यजित मोरे,सौरभ शेंडगे,किरण मिसाळ यांनीही पेक्षणीय विजयी कुस्त्या केल्या.मामा तरंगे व राहुल काळे,महेश पवार व सागर जाधव यांच्या कुस्त्यांनीही कुस्ती शौकी्नांची वाहवा मिळवली.यावेळी मल्लसम्राट रावसाहेब मगर यांनी प्रभाकर दगडे यांना मानाचा फेटा...

एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

Image
**एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.     इंदापूर : पळसदेव (ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेचा वर्धापन दिन  दि. 16 जानेवारी 2025 रोजी  मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यामध्ये संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हनुमंत (नाना) बनसुडे  यांनी आपल्या भाषणातून संस्थेची यशोगाथा सांगितली तसेच आंतरशालेय  सांघिक खेळामधील सहभागी विद्यार्थ्यांना त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले तसेच एलिमेंट्री व इंटरमिजिएट चा रिझल्ट शंभर टक्के लावल्याबद्दल कला शिक्षिका प्रतिभा भोसले मॅडम, अंबिका बनसुडे यांचाही शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून त्यांचे या शाळेमध्ये असलेले अनुभव सांगितले , पहिली ,दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता गुणवत्ता व माझी शाळा अशा गीतामधून शाळेविषयी एक चांगला संदेश दिला तसेच सहावीच्या विद्यार्थ्यांनी मला बाजारला जायचे या नाटिकेतून प्लास्ट...

आसवनी प्रकल्पांचे मल्टिफीड मध्ये रूपांतर केल्यास वर्षभर इथेनॉलचे उत्पादन शक्य - हर्षवर्धन पाटील

Image
आसवनी प्रकल्पांचे मल्टिफीड मध्ये रूपांतर केल्यास वर्षभर इथेनॉलचे उत्पादन शक्य - हर्षवर्धन पाटील  •पुणे येथे हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली   साखर संकुलमध्ये बैठक •देशभरातील अधिकारी व तज्ञांची बैठकीस उपस्थिती इंदापूर : प्रतिनिधी दि.17/1/25                       आगामी काळात इथेनॉलचे उत्पादन हे धान्याचा वापर करून वर्षभर घेता येणार आहे, त्याचा आर्थिक फायदा कारखान्यांना होणार आहे. त्यासाठी साखर कारखान्यांनी सध्याच्या आसवनी प्रकल्पांचे मल्टिफीड मध्ये रूपांतर केल्यास वर्षभर इथेनॉलचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे येथे शुक्रवारी (दि.17)  केले.         पुणे येथील साखर संकुलमध्ये देशातील इथेनॉल उत्पादन वाढीसाठी कोणती पाऊले उचलावीत यावर विचार करणेसाठी देशभरातील सहकार क्षेत्रात काम करणारे अधिकारी व तज्ज्ञांची बैठक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या अध्...

स्कूल कनेक्ट २.० च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती- सचिव विरसिंह रणसिंग

Image
स्कूल कनेक्ट २.० च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती- सचिव विरसिंह रणसिंग  इंदापूर : कळंब ता. इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्कूल कनेक्ट २.० उपक्रमाचे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव  वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सचिव विरसिंह रणसिंग यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्कूल कनेक्ट २.०' उपक्रम राबविला जात असल्याचे सांगितले.शासनाच्या शिक्षणक्षेत्रात होत असलेल्या बदलांबरोबर रणसिंग महाविद्यालय बदलत असून सर्व स्तरातील तसेच  गोरगरीब, होतकरू, हुशार विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाची दालने सदैव खुली असतील अशी ग्वाही विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमासाठी ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे संचालक प्रतापसिंह कदम, ग्रामपंचायत वालचंदनगरचे माजी उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड, वालचंद विद्यालयाचे प्राच...

वडापुरीत साठेनगर अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाचा गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या हस्ते शुभारंभ.

Image
वडापुरीत साठेनगर अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाचा गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या हस्ते शुभारंभ. इंदापूर : वडापुरी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात  दि. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रातीचे औचित्य साधून एकात्मिक बाल विकास सेवा योजना इंदापूर १ व २ मधील सण २०२३- २४ मधील साठेनगर अंगणवाडी केंद्र इमारत बांधकाम मंजूर झालेली असून सदरच्या अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाचे नारळ फोडून इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व इंदापूर बालविकास अधिकारी अमोल मेरगळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.  तसेच वडापुरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला सदिच्छा भेट देऊन पशुवैद्यकीय सेवे संदर्भात चौकशी करून पशुवैद्यकीय दवाखान्याच्या रंगरंगोटीची पाहणी केली.  यावेळी ग्रामपंचायत अधिकारी नंदराज चंदनशिवे, मा. उपसरपंच भागवत काटकर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे,मा. सरपंच आसमा मुलानी, मा. उपसरपंच विठ्ठल कदम, मा. ग्रामपंचायत सदस्य आनंद चंदनशिवे, मा. ग्रामपंचायत सदस्य अंबिका बागल, पशुवैद्यकीय अधिकारी डी. एस. हांगे, परिचर विनायक जाधव,अंगणवाडी सेविका म...

शेटफळ तलावातुन मिळणार चार सिंचन आवर्तने - कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती*

Image
*शेटफळ तलावातुन मिळणार चार सिंचन आवर्तने - कॅबिनेट मंत्री  दत्तात्रय भरणे यांची माहिती* इंदापूर : शेटफळ मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक आज दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी दत्तात्रय भरणे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत, पुणे येथील नविन सर्किट हाऊस येथे संपन्न झाली. शेटफळ तलावात आज रोजी उपलब्ध असलेल्या ६०० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्यातून रब्बी हंगामासाठी एक आवर्तन व उन्हाळा हंगामासाठी तीन आवर्तने देण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन केले असल्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. पावसाळा संपून दोन महिने झाले असून सध्या रब्बीच्या पिकासाठी पाण्याची गरज भासत आहे. शेटफळ तलावातून दिनांक १४/०१/२०२५ पासून आवर्तन सोडण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना श्री. भरणे यांनी दिल्या. उपलब्ध पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करून अधिकारी व कालवा निरीक्षक यांनी अतिशय गांभीर्याने काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांनी थकीत पाणीपट्टी भरून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांनी केलेल्या सूचनांप्रमाणे वीर धरणातील अतिरिक...

अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करा -अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे

Image
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करा -अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर (मुंबई ,)दि.8:-राज्यातील अल्पसंख्याक समाजाचा  सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी, नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून लोकाभिमुख उपक्रम राबवावेत अशा सूचना अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबधीत अधिकाऱ्यांना दिल्या. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आज मंत्रालयात मंत्री श्री. भरणे यांनी अल्पसंख्याक विकास विभागाचा आढावा घेतला. यावेळी सचिव रुचेश जयवंशी, सहसचिव मोईन ताशिलदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री. भरणे म्हणाले, अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहत आणण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करणे, स्वयंसहायता बचतगट योजना महत्वपूर्ण आहेत. ...

गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार**क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे**द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा सन्मान*

Image
*गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार* *क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे* *द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा सन्मान* इंदापूर (मुंबई,) दि. 7: खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच युवा पिढीमध्ये खेळाची रूची वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर राज्यात गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणार असून क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितले. आज मंत्रालयातील दालनात मंत्री श्री. भरणे यांनी पदभार स्विकारला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला. याप्रसंगी ते बोलत होते. क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक नवनाथ फडतरे यांसह अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री. भरणे म्हणाले की, क्रीडा, युवक कल्याण विभाग, अल्पसंख्याक, औकाफ विभागाच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीत भरीव योगदान देणार आहे. खेळाडूंना...

शुरपराक्रमी होळकरांचा छावा-- चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर.

Image
शुरपराक्रमी होळकरांचा छावा-- चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर. इंदापूर :    सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यानंतर..  मातोश्री अहिल्यादेवी यांना होळकरांच्या गादीवर बसवण्यात आले. मातोश्री अहिल्यादेवींचा कारभार अतिशय चोख आणि निस्वार्थ होता. पंमातोश्रींच्या मृत्यूनंतर मल्हार रावांचे पुतणे (चुलत चुलत भावाचा मुलगा)व मानसपुत्र तुकोजीराव होळकर यांना होळकरांच्या गादीचा मान मिळाला.  तुकोजीरावांना चार मुले होती. पहिली पत्नी रखमाबाई यांना काशीराव व मल्हारराव तर दुसरी पत्नी यमुनाबाई यांना विठोजीराव व यशवंतराव. यशवंतरावांचा जन्म १७७७ साली झाला. काशिराम सर्वात थोरले  व यशवंतराव सर्वात धाकटे होते. चारही मुले इंदोर आणि महेश्वर येथे मातोश्री अहिल्यादेवींच्या नजरेत वाढलेली होती. तुकोजीराव वृद्ध झाल्यानंतर त्यांच्या हयातीतच त्यांनी ज्येष्ठ पुत्र काशीराव यांच्याकरिता पेशव्यांकडे राजवस्त्राची मागणी केली होती. आपला उत्तर अधिकारी काशिराव असेल असे जाहीर केलें होते.  परंतु महादजी शिंदेंने होळकरांच्या राज्यात हस्तक्षेप चालू केला, दादागिरी चालू केली, जबरदस्तीने कर वसु...

पत्रकारांच्या आर्थिक विकास महामंडळावर इंदापूरला संधी द्या - विजयसिंह मोहिते पाटील ** इंदापुरात पत्रकार दिन सोहळ्यानिमित्त विकासाच्या भागीदारांचा पुरस्कार देऊन सन्मान

Image
पत्रकारांच्या आर्थिक विकास महामंडळावर इंदापूरला संधी द्या - विजयसिंह मोहिते पाटील  ** इंदापुरात पत्रकार दिन सोहळ्यानिमित्त विकासाच्या भागीदारांचा पुरस्कार देऊन सन्मान  इंदापूर(प्रतिनिधी):इंदापूर येथील शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने कोरोना कालावधीत १४ हजार कुटुंबांना,सलग दोन वर्ष अन्नधान्य मोफत पुरवून,व बाविस गावांमध्ये वृक्षारोपण करून आदर्श निर्माण केला आहे.या पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांचे आदर्शवत कार्य असल्याने,शासन स्थापन करीत असलेल्या,पत्रकारांचे आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक पदी  नियुक्ती करून,त्यांचा सन्मान केल्यास, आगामी काळात राज्यातील पत्रकारांना मदत मिळवून देण्यासाठी मोठी मदत होईल,यासाठी शासनाकडे आग्रह धरणार असल्याची माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिली.          इंदापूर शहरातील डॉ.नीतू मांडके आय एम ए हाऊस सभागृहात,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने,सोमवार (ता.६ जानेवारी)रोजी पत्रकार दिन सोहळ्याचे आय...

एल.जी. बनसुडे विद्यालयात बालिका दिन उत्साहात साजरा* .

Image
*एल.जी. बनसुडे विद्यालयात बालिका दिन उत्साहात साजरा* . इंदापूर : पळसदेव( ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी.बनसुडे विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात सावित्रीबाई फुले जयंती (बालिका दिन)साजरा करण्यात आला.  यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा  नंदाताई बनसुडे व संस्थेचे अध्यक्ष  हनुमंत बनसुडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले .मुख्याध्यापक राहुल वायसे  यांनी आपल्या प्रास्ताविकेतून  विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट सांगितला.विद्यार्थ्यांची भाषणे झाली शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशात खुप छान दिसत होत्या. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या नाटिका सादर केल्या . प्राचार्या वंदना बनसुडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना संबोधित केले . संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे व कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे यांचा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले म्हणून सन्मान करण्यात आला .संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत (नाना) बनसुडे यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी मिळवलेल्या यशाबद्दल मुलींचे कौतुक केले .यावेळी संस्थेचे ...

एल.जी. बनसुडे विद्यालयायाच्या कार्याध्यक्षा सौ.नंदाताई बनसुडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरशालेय क्रीडा स्पर्धां उत्सात संपन्न.

Image
* एल.जी. बनसुडे विद्यालयायाच्या कार्याध्यक्षा सौ.नंदाताई बनसुडे यांच्या वाढदिवसानिमित्त  आंतरशालेय क्रीडा स्पर्धां उत्सात संपन्न. इंदापूर : पळसदेव (दि-२५ डिसें २०२४) येथील "गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित "एल.जी. बनसुडे विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. नंदाताई बनसुडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंतरशालेय क्रीडा स्पर्धा , रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये नर्सरी  ते ४थी लिंबू चमचा, रनींग,पोत्यातील उड्या तर 5 वी ते 12 वी कबड्डी, खोखो, रनिंग , क्रिकेट, किक बॉक्सिंग अश्या  स्पर्धा पार पडल्या तसेच  ग्राउंड पूजन व २५ झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले या प्रसंगी   संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे ,कार्याध्यक्षा सौ नंदाताई बनसुडे, उपाध्यक्ष शितल कुमार शहा,  सचिव नितीन बनसुडे,  सदस्य हनुमंत आप्पा मोरे अर्चनाताई बनसुडे , अंकुश बनसुडे ,पालक सदस्य संजय मारकड,प्रिन्सिपल  वंदना बनसुडे , मुख्याध्यापक राहुल वायसे  समन्वयक सुवर्णा वाघमोडे, विभाग प्रमुख प्रवीण मदने ,ते...

एल.जी. बनसुडे विद्यालयामध्ये रोटरी स्कुल पेंट प्रोजेक्ट भिगवन व जी डी बी & कोटिंगचे उद्घाटन*

Image
* एल.जी. बनसुडे विद्यालयामध्ये रोटरी स्कुल पेंट प्रोजेक्ट भिगवन व जी डी बी & कोटिंगचे उद्घाटन*  इंदापूर : पळसदेव (ता. इंदापूर)येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी.बनसुडे विद्यालयामध्ये रोटरी स्कुल पेंट प्रोजेक्ट व जी डी बी & कोटिंगचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमास जी डी बी पेंट अँड कोटिंग चे प्रोग्रॅम मॅनेजर   अतुल कुलकर्णी साहेब यांनी उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ही भूषविले.   यावेळी  रोटरी क्लब ऑफ भिगवण चे अध्यक्ष श्री संतोष सवाने , सेक्रेटरी संजय रायसोनी, खजिनदार कुलदीप ननवरे, रियाजभाई शेख , संजय खाडे , एलजी बनसुडे स्कूलचे उपाध्यक्ष शितल कुमार शहा , नंदाताई (नानी ) बनसुडे सचिव नितीन बनसुडे, सदस्य अंकुश बनसुडे, हनुमंत आप्पा मोरे ,अर्चनाताई बनसुडे , अशोक बनसुडे, सुनील काळेल, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे आदी मान्यवर उपस्थित होते.   उद्घाटन प्रसंगी बोलताना संतोष सवानी आणि रियाज भाई शेख यांनी रोटरी क्लब देत असलेल्या योगदानाबद्दल माहिती देत असताना...

एल.जी.बनसुडे विद्यालयाच्या प्रांगणात* *नाताळ सणाची धूम*

Image
*एल.जी.बनसुडे विद्यालयाच्या प्रांगणात* *नाताळ सणाची धूम*   इंदापूर : *पळसदेव* (दि २५ डिसें) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी बनसुडे विद्यालयात चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. नाताळ सण हा सांस्कृतिक उत्सव म्हणून देखील पाहिला जातो. येशू ख्रिस्ताच्या शिकवणी प्रमाणे विद्यार्थ्यांना प्रेम, करुणा व त्याग भाव वृत्ती असायला हवी. असे संस्थेच्या प्राचार्या वंदना बनसुडे  यांनी सांगत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्री प्रायमरी विभागातून अनेक उपक्रम घेण्यात आले ,यामध्ये सीनियर केजी  मधील विद्यार्थ्यांनी डान्स सादर केले. सर्व मुलांसाठी विविध खेळ घेण्यात आले तसेच काही विद्यार्थी सांताक्लॉजची भूमिकेत येऊन मुलांसाठी खाऊ व गिफ्ट दिले गेले .त्यावेळेस संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, सचिव नितीन बनसुडे उपाध्यक्ष डॉक्टर शितल कुमार शहा ,सदस्य अर्चना बनसुडे,हनुमंत अप्पा मोरे,अंकुश बनसुडे इ. मान्यवरांनी दर्शवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. क...

इंदापूर महाविद्यालयातील दोन छात्र सैनिकांची अग्णिविर मध्ये निवड*

Image
**इंदापूर महाविद्यालयातील दोन छात्र सैनिकांची अग्णिविर मध्ये निवड*  इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य  महाविद्यालयमध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना अध्यक्ष व राज्याचे माजी मंत्री मा. हर्षवर्धन पाटील यांच्या मार्ग दर्शणाखाली छात्र सैनिक- अजिंक्य गोरे आणि विराज कोकाटे या दोघांची भारतीय सैन्य अग्निविर मध्ये निवड होऊन आणि यशस्वीरीत्या कठोर आणि खडतर प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर महाविद्यायातर्फे प्राचार्य प्रा. डॉ- जीवन सरवदे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या यावेळी  महाविद्यालयातील विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर आणि परीक्षा विभाग प्रमुख डॉ. आत्माराम फलफले आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख प्रा.दिनेश जगताप उपस्थित होते.

कौठळी शाळेत ग्राहक हक्क दिन साजरा

Image
कौठळी शाळेत ग्राहक हक्क दिन साजरा            "सुजाण ग्राहक व्हा,      केवळ गिऱ्हाईक बनू नका.!" इंदापूर : दिनांक २४ डिसेंबर -जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला.शिक्षिका आरती गायकवाड यांनी मुलांना ग्राहक कायद्याविषयी माहिती दिली.त्यामध्ये ग्राहक म्हणून आपण सजग राहिले पाहिजे.आपली फसवणूक होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे असे गायकवाड यांनी सांगितले.मुख्याध्यापक भारत ननवरे यांनी ग्राहकास असणारे सहा हक्क सांगितले. त्यामध्ये सुरक्षेचा हक्क,माहितीचा हक्क, निवड करण्याचा अधिकार, म्हणणे मांडण्याचा हक्क,तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क,ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार यांचा समावेश होतो.