एल.जी.बनसुडे विद्यालयाच्या प्रांगणात* *नाताळ सणाची धूम*
इंदापूर : *पळसदेव* (दि २५ डिसें)
येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी बनसुडे विद्यालयात चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. नाताळ सण हा सांस्कृतिक उत्सव म्हणून देखील पाहिला जातो. येशू ख्रिस्ताच्या शिकवणी प्रमाणे विद्यार्थ्यांना प्रेम, करुणा व त्याग भाव वृत्ती असायला हवी. असे संस्थेच्या प्राचार्या वंदना बनसुडे यांनी सांगत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्री प्रायमरी विभागातून अनेक उपक्रम घेण्यात आले ,यामध्ये सीनियर केजी मधील विद्यार्थ्यांनी डान्स सादर केले. सर्व मुलांसाठी विविध खेळ घेण्यात आले तसेच काही विद्यार्थी सांताक्लॉजची भूमिकेत येऊन मुलांसाठी खाऊ व गिफ्ट दिले गेले .त्यावेळेस संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, सचिव नितीन बनसुडे उपाध्यक्ष डॉक्टर शितल कुमार शहा ,सदस्य अर्चना बनसुडे,हनुमंत अप्पा मोरे,अंकुश बनसुडे इ. मान्यवरांनी दर्शवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कार्यक्रम यशस्वी रित्या पार करण्यासाठी विभागातील सर्व शिक्षिका स्नेहल गायकवाड, निकिता गोरे, सोनाली साळवे, विजया आटपाडकर, वसुधा नगरे यांनी प्रयत्न केले. कला शिक्षिका अंबिका बनसुडे यांनी विद्यार्थ्यांसाठी ख्रिसमस संदर्भात अनेक उपक्रम राबवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती मारकड यांनी करत सर्वधर्मसमभाव व बंधुभाव ही मूल्य रुजवण्यासाठी नाताळ सण साजरा करण्यात आला अशी सांगता केली.
Comments
Post a Comment