वडापुरीत साठेनगर अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाचा गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या हस्ते शुभारंभ.

वडापुरीत साठेनगर अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाचा गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या हस्ते शुभारंभ.
इंदापूर : वडापुरी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात  दि. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रातीचे औचित्य साधून एकात्मिक बाल विकास सेवा योजना इंदापूर १ व २ मधील सण २०२३- २४ मधील साठेनगर अंगणवाडी केंद्र इमारत बांधकाम मंजूर झालेली असून सदरच्या अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाचे नारळ फोडून इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व इंदापूर बालविकास अधिकारी अमोल मेरगळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
 तसेच वडापुरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला सदिच्छा भेट देऊन पशुवैद्यकीय सेवे संदर्भात चौकशी करून पशुवैद्यकीय दवाखान्याच्या रंगरंगोटीची पाहणी केली. 
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी नंदराज चंदनशिवे, मा. उपसरपंच भागवत काटकर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे,मा. सरपंच आसमा मुलानी, मा. उपसरपंच विठ्ठल कदम, मा. ग्रामपंचायत सदस्य आनंद चंदनशिवे, मा. ग्रामपंचायत सदस्य अंबिका बागल, पशुवैद्यकीय अधिकारी डी. एस. हांगे, परिचर विनायक जाधव,अंगणवाडी सेविका माधुरी कदम, , सोमनाथ पवार, महादेव चंदनशिवे, विलास गायकवाड,आप्पा पासगे,संतोष पासगे,चांगदेव पासगे, गुलाब चंदनशिवे,अभिजीत पवार, दादा चंदनशिवे, महेश देवकर, संजय तोबरे इत्यादी उपस्थित होते.

दरम्यान गट विकास अधिकारी सचिन खुडे यांनी वडापुरी च्या तलावाचे, बुद्ध विहार, तसेच श्रीनाथ मंदिर येथील कामाची पाहणी करून वडापुरीच्या वैभव मध्ये भर देणारी हे ठिकाणे असून याचा विकास करण्यासंदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून कशा पद्धतीने होईल ते यावेळी सांगितले.


Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*