वरकुटे खुर्दच्या आखाड्यात प्रेक्षणीय कुस्त्या**रविराज चव्हाण ची सत्पाल सोनटक्के वर मात*
*वरकुटे खुर्दच्या आखाड्यात प्रेक्षणीय कुस्त्या*
*इंदापूर :वरकुटे खुर्द(ता. इंदापूर)येथील पीरसाहेब यात्रेनिमित्त गुरुवारी झालेल्या कुस्ती आखाड्यात दोन लाख अकरा हजार इनामाच्या कुस्तीत आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र,पुणे च्या रविराज चव्हाण याने शिवनेरी तालीम,अकलूज च्या सत्पाल सोनटक्के चा एकेरी कस चढवून चिटपट कुस्ती करून विजय मिळवला.विजयी रविराज चव्हाण याला दूधगंगा दुध संघाचे माजी अध्यक्ष नवनाथ पिराजी ठवरे-पाटील यांचे स्मरणार्थ सोमनाथ ठवरे यांचेकडून पीरसाहेब केसरी किताब व गदा भेट देण्यात आली.*
*हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेच्या ग्रामदैवत पीरसाहेब यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात सात तास चाललेल्या आखाड्यात तीनशे प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या.तेजस शिंदे,स्वप्नील दगडे,सत्यजित मोरे,सौरभ शेंडगे,किरण मिसाळ यांनीही पेक्षणीय विजयी कुस्त्या केल्या.मामा तरंगे व राहुल काळे,महेश पवार व सागर जाधव यांच्या कुस्त्यांनीही कुस्ती शौकी्नांची वाहवा मिळवली.यावेळी मल्लसम्राट रावसाहेब मगर यांनी प्रभाकर दगडे यांना मानाचा फेटा बांधून सत्कार केला.तसेच महान मल्ल आण्णासाहेब शिंदे,बजरंग यादव यांचाही आखाड्यात सत्कार करण्यात आला.*
*या कुस्ती मैदानासाठी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील,माजी सभापती अंकुश जाधव, देवराज जाधव,दशरथ डोंगरे,मच्छिन्द्र चांदणे,दत्तात्रय शेंडे,वसंत मोहोळकर,राहुल जाधव,संतोष राजगुरू,बाळासाहेब हरणावळ, वस्ताद मारुती माळी, सचिन बनकर, शशिकांत सोनार,अस्लम मुलाणी यांचे उपस्थितीबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच गावातील विविध पदावर निवड झालेल्या सोळा सत्कार मूर्तीचा सत्कार करण्यात आला.*
*यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोविंद शेंडे,सरपंच बापूराव शेंडे, ॲड.कृष्णाजी यादव,रतन हेगडे,ॲड.शशिकांत शेंडे,शिवाजी यादव,राज पाटील,नितीन देविदास शेंडे,संतोष मोरे,महादेव मिसाळ,दत्तात्रय मासाळ, दादाराम शेंडे,वैजूद्दीन मुलाणी,ऍड.संदीप शेंडे,गणेश शेंडे,हनुमंत पवार,मारुती मासाळ,भारत भोंगळे,नागनाथ शेंडे,भगवान शेंडे,मारुती शेंडे,राजाराम शेंडे,लक्ष्मण शेंडे,माणिक यादव,बबन शेंडे,युवराज म्हेत्रे,धनाजी शिंदे,पिराजी शेंडे,बापूराव शिंदे,शहाजी दगडे,विलास शेंडे,नितीन हिराजी शेंडे,बकस शेख, चंद्रकांत शेंडे,नितीन केसकर,गोरख पवार,लतीफ पठाण,हनुमंत ठवरे,कैलास शिंदे,शंकर शिंदे,अमोल शिंदे,जनार्दन यादव,दिलीप ठवरे, प्रल्हाद देवकाते,कांतीलाल यादव,भीमराव शेंडे,नवनाथ दगडे,कुंडलिक ठवरे,लक्ष्मण शेंडे,पांडुरंग शेंडे,अस्लम मुलाणी,समीर मुलाणी,मंगेश शेंडे,योगेश पांढरे,बबलू पठाण,सागर ठवरे, रतन ठवरे, बाळासाहेब शेंडे,बाळासाहेब मोरे,बाळासाहेब ठवरे,विठ्ठल शेंडे, बबन क्षीरसागर,अमोल शिंदे, अमोल शेंडे,मधुकर शेंडे,तेजस ठवरे,दादाभाई मुलाणी, रियाज मुलाणी यांचेसह यात्रा कमिटीने आखाड्याचे नियोजन केले होते.*
*पैलवान पोपट शिंदे व राजू शिंदे यांनी कुस्त्या जोडण्याचे काम केले.किरण म्हेत्रे,शहानूर मुलाणी,प्रवीण ठवरे व शशिकांत शेंडे यांनी कुस्ती समालोचन केले.या कुस्ती मैदानासाठी हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते.पीरसाहेब उरुसामध्ये मंगळवारी संदल,बुधवारी यात्रा मुख्य दिवस,देवाचा छबीना,शोभेचे दारूकाम व संध्याकाळी झंकार बिट्स ऑर्केस्ट्रा, कोल्हापूर यांचा करमणूकीचा कार्यक्रम झाला.यात्रा उत्सव उत्साहात संपन्न झाला.*
Comments
Post a Comment