एल.जी. बनसुडे विद्यालयामध्ये रोटरी स्कुल पेंट प्रोजेक्ट भिगवन व जी डी बी & कोटिंगचे उद्घाटन*

*एल.जी. बनसुडे विद्यालयामध्ये रोटरी स्कुल पेंट प्रोजेक्ट भिगवन व जी डी बी & कोटिंगचे उद्घाटन* 
इंदापूर : पळसदेव (ता. इंदापूर)येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी.बनसुडे विद्यालयामध्ये रोटरी स्कुल पेंट प्रोजेक्ट व जी डी बी & कोटिंगचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमास जी डी बी पेंट अँड कोटिंग चे प्रोग्रॅम मॅनेजर   अतुल कुलकर्णी साहेब यांनी उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ही भूषविले.
  यावेळी  रोटरी क्लब ऑफ भिगवण चे अध्यक्ष श्री संतोष सवाने , सेक्रेटरी संजय रायसोनी, खजिनदार कुलदीप ननवरे, रियाजभाई शेख , संजय खाडे , एलजी बनसुडे स्कूलचे उपाध्यक्ष शितल कुमार शहा , नंदाताई (नानी ) बनसुडे सचिव नितीन बनसुडे, सदस्य अंकुश बनसुडे, हनुमंत आप्पा मोरे ,अर्चनाताई बनसुडे , अशोक बनसुडे, सुनील काळेल, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे आदी मान्यवर उपस्थित होते.
  उद्घाटन प्रसंगी बोलताना संतोष सवानी आणि रियाज भाई शेख यांनी रोटरी क्लब देत असलेल्या योगदानाबद्दल माहिती देत असताना त्यातील एल जी बनसुडे संस्था हा आमच्या दृष्टीने मोठा प्रकल्प आम्ही हाती घेतला असल्याचे सांगितले, तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत बनसुडे यांनी रोटरी क्लब भिगवन तसेच जी डी बी पेंट अँड कोटिंग कंपनीने केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश दरदरे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*