एल.जी. बनसुडे विद्यालयात बालिका दिन उत्साहात साजरा* .
इंदापूर : पळसदेव( ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी.बनसुडे विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात सावित्रीबाई फुले जयंती (बालिका दिन)साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे व संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले .मुख्याध्यापक राहुल वायसे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट सांगितला.विद्यार्थ्यांची भाषणे झाली शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशात खुप छान दिसत होत्या. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या नाटिका सादर केल्या . प्राचार्या वंदना बनसुडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना संबोधित केले . संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे व कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे यांचा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले म्हणून सन्मान करण्यात आला .संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत (नाना) बनसुडे यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी मिळवलेल्या यशाबद्दल मुलींचे कौतुक केले .यावेळी संस्थेचे सचिव नितिन बनसुडे, समन्वयक सुवर्णा वाघमोडे,विभाग प्रमुख प्रविण मदने, तेजस्विनी तनपुरे,सीमा बाराते , सर्व शिक्षक व पालक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या पोटे यांनी केले.
Comments
Post a Comment