एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन
*एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन. इंदापूर : पळसदेव* दि.18जाने 2025 रोजी गव्हर्नमेंट हॉस्पिटल पळसदेव मधून आशाताई यांचे मार्फत एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये सहावी ते बारावी मधील सर्व किशोवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. आशाताई सुनंदा कांबळे यांनी मुलींना मासिक पाळी , स्वच्छता याबद्दल मार्गदर्शन केले तसेच शाळेतील सहशिक्षिका सौ विद्या पोटे मॅडम यांनी मुलींमधील होणारे बदल, पौगंडावस्थेतील बदल, स्वच्छता, सोशल मीडियाचा अतिवापर याबद्दल उत्कृष्ट माहिती दिली कार्यक्रमासाठी प्राचार्या सौ वंदना बनसुडे, विभाग प्रमुख सौ सिमा बाराते, समन्वयक सौ सुवर्णा वाघमोडे आशाताई राणी बनसुडे, केशर वाघमोडे, शोभा ढावरे, सहशिक्षिका, सुजाता ढवळे,सीमा आदलिंग यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला
Comments
Post a Comment