एल.जी. बनसुडे विद्यालयायाच्या कार्याध्यक्षा सौ.नंदाताई बनसुडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरशालेय क्रीडा स्पर्धां उत्सात संपन्न.

*एल.जी. बनसुडे विद्यालयायाच्या कार्याध्यक्षा सौ.नंदाताई बनसुडे यांच्या वाढदिवसानिमित्त  आंतरशालेय क्रीडा स्पर्धां उत्सात संपन्न.
इंदापूर : पळसदेव (दि-२५ डिसें २०२४)
येथील "गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित "एल.जी. बनसुडे विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. नंदाताई बनसुडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंतरशालेय क्रीडा स्पर्धा , रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
यामध्ये नर्सरी  ते ४थी लिंबू चमचा, रनींग,पोत्यातील उड्या तर 5 वी ते 12 वी कबड्डी, खोखो, रनिंग , क्रिकेट, किक बॉक्सिंग अश्या  स्पर्धा पार पडल्या तसेच  ग्राउंड पूजन व २५ झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले
या प्रसंगी
  संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे ,कार्याध्यक्षा सौ नंदाताई बनसुडे, उपाध्यक्ष शितल कुमार शहा,  सचिव नितीन बनसुडे,  सदस्य हनुमंत आप्पा मोरे अर्चनाताई बनसुडे , अंकुश बनसुडे ,पालक सदस्य संजय मारकड,प्रिन्सिपल  वंदना बनसुडे , मुख्याध्यापक राहुल वायसे  समन्वयक सुवर्णा वाघमोडे, विभाग प्रमुख प्रवीण मदने ,तेजस्विनी तनपुरे ,ज्योती मारकड ,सीमा बाराते  , तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
     या स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना  प्रमुख पाहुण्याच्या हस्ते १८०मेडल व १६ ट्रॉफी देऊन मुलांचा गुणगौरव करण्यात आला तसेच  लुधियाना (पंजाब) येथे संघ प्रशिक्षक कामकाज केल्याबद्दल रुपेश भालेराव ,राष्ट्रीय ज्युदो खेळाडू जगदीश तोंडे, सृष्टी बनसुडे या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला .
   क्रीडा शिक्षक  सतीश बनसुडे  यांनी किक बॉक्सिंग स्पर्धेचे प्रदर्शन केले.
  क्रिकेट स्पर्धेचे समालोचन प्रकाश दरदरे  यांनी केले तर  अमित शेलार सर आणि ऋषिकेश गणगणे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*