Posts

स्कूल कनेक्ट २.० च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती- सचिव विरसिंह रणसिंग

Image
स्कूल कनेक्ट २.० च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती- सचिव विरसिंह रणसिंग  इंदापूर : कळंब ता. इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्कूल कनेक्ट २.० उपक्रमाचे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव  वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सचिव विरसिंह रणसिंग यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्कूल कनेक्ट २.०' उपक्रम राबविला जात असल्याचे सांगितले.शासनाच्या शिक्षणक्षेत्रात होत असलेल्या बदलांबरोबर रणसिंग महाविद्यालय बदलत असून सर्व स्तरातील तसेच  गोरगरीब, होतकरू, हुशार विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाची दालने सदैव खुली असतील अशी ग्वाही विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमासाठी ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे संचालक प्रतापसिंह कदम, ग्रामपंचायत वालचंदनगरचे माजी उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड, वालचंद विद्यालयाचे प्राच...

वडापुरीत साठेनगर अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाचा गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या हस्ते शुभारंभ.

Image
वडापुरीत साठेनगर अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाचा गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या हस्ते शुभारंभ. इंदापूर : वडापुरी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात  दि. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रातीचे औचित्य साधून एकात्मिक बाल विकास सेवा योजना इंदापूर १ व २ मधील सण २०२३- २४ मधील साठेनगर अंगणवाडी केंद्र इमारत बांधकाम मंजूर झालेली असून सदरच्या अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाचे नारळ फोडून इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व इंदापूर बालविकास अधिकारी अमोल मेरगळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.  तसेच वडापुरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला सदिच्छा भेट देऊन पशुवैद्यकीय सेवे संदर्भात चौकशी करून पशुवैद्यकीय दवाखान्याच्या रंगरंगोटीची पाहणी केली.  यावेळी ग्रामपंचायत अधिकारी नंदराज चंदनशिवे, मा. उपसरपंच भागवत काटकर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे,मा. सरपंच आसमा मुलानी, मा. उपसरपंच विठ्ठल कदम, मा. ग्रामपंचायत सदस्य आनंद चंदनशिवे, मा. ग्रामपंचायत सदस्य अंबिका बागल, पशुवैद्यकीय अधिकारी डी. एस. हांगे, परिचर विनायक जाधव,अंगणवाडी सेविका म...

शेटफळ तलावातुन मिळणार चार सिंचन आवर्तने - कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती*

Image
*शेटफळ तलावातुन मिळणार चार सिंचन आवर्तने - कॅबिनेट मंत्री  दत्तात्रय भरणे यांची माहिती* इंदापूर : शेटफळ मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक आज दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी दत्तात्रय भरणे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत, पुणे येथील नविन सर्किट हाऊस येथे संपन्न झाली. शेटफळ तलावात आज रोजी उपलब्ध असलेल्या ६०० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्यातून रब्बी हंगामासाठी एक आवर्तन व उन्हाळा हंगामासाठी तीन आवर्तने देण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन केले असल्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. पावसाळा संपून दोन महिने झाले असून सध्या रब्बीच्या पिकासाठी पाण्याची गरज भासत आहे. शेटफळ तलावातून दिनांक १४/०१/२०२५ पासून आवर्तन सोडण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना श्री. भरणे यांनी दिल्या. उपलब्ध पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करून अधिकारी व कालवा निरीक्षक यांनी अतिशय गांभीर्याने काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांनी थकीत पाणीपट्टी भरून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांनी केलेल्या सूचनांप्रमाणे वीर धरणातील अतिरिक...

अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करा -अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे

Image
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करा -अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर (मुंबई ,)दि.8:-राज्यातील अल्पसंख्याक समाजाचा  सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी, नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून लोकाभिमुख उपक्रम राबवावेत अशा सूचना अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबधीत अधिकाऱ्यांना दिल्या. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आज मंत्रालयात मंत्री श्री. भरणे यांनी अल्पसंख्याक विकास विभागाचा आढावा घेतला. यावेळी सचिव रुचेश जयवंशी, सहसचिव मोईन ताशिलदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री. भरणे म्हणाले, अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहत आणण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करणे, स्वयंसहायता बचतगट योजना महत्वपूर्ण आहेत. ...

गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार**क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे**द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा सन्मान*

Image
*गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार* *क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे* *द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा सन्मान* इंदापूर (मुंबई,) दि. 7: खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच युवा पिढीमध्ये खेळाची रूची वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर राज्यात गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणार असून क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितले. आज मंत्रालयातील दालनात मंत्री श्री. भरणे यांनी पदभार स्विकारला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला. याप्रसंगी ते बोलत होते. क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक नवनाथ फडतरे यांसह अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री. भरणे म्हणाले की, क्रीडा, युवक कल्याण विभाग, अल्पसंख्याक, औकाफ विभागाच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीत भरीव योगदान देणार आहे. खेळाडूंना...

शुरपराक्रमी होळकरांचा छावा-- चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर.

Image
शुरपराक्रमी होळकरांचा छावा-- चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर. इंदापूर :    सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यानंतर..  मातोश्री अहिल्यादेवी यांना होळकरांच्या गादीवर बसवण्यात आले. मातोश्री अहिल्यादेवींचा कारभार अतिशय चोख आणि निस्वार्थ होता. पंमातोश्रींच्या मृत्यूनंतर मल्हार रावांचे पुतणे (चुलत चुलत भावाचा मुलगा)व मानसपुत्र तुकोजीराव होळकर यांना होळकरांच्या गादीचा मान मिळाला.  तुकोजीरावांना चार मुले होती. पहिली पत्नी रखमाबाई यांना काशीराव व मल्हारराव तर दुसरी पत्नी यमुनाबाई यांना विठोजीराव व यशवंतराव. यशवंतरावांचा जन्म १७७७ साली झाला. काशिराम सर्वात थोरले  व यशवंतराव सर्वात धाकटे होते. चारही मुले इंदोर आणि महेश्वर येथे मातोश्री अहिल्यादेवींच्या नजरेत वाढलेली होती. तुकोजीराव वृद्ध झाल्यानंतर त्यांच्या हयातीतच त्यांनी ज्येष्ठ पुत्र काशीराव यांच्याकरिता पेशव्यांकडे राजवस्त्राची मागणी केली होती. आपला उत्तर अधिकारी काशिराव असेल असे जाहीर केलें होते.  परंतु महादजी शिंदेंने होळकरांच्या राज्यात हस्तक्षेप चालू केला, दादागिरी चालू केली, जबरदस्तीने कर वसु...

पत्रकारांच्या आर्थिक विकास महामंडळावर इंदापूरला संधी द्या - विजयसिंह मोहिते पाटील ** इंदापुरात पत्रकार दिन सोहळ्यानिमित्त विकासाच्या भागीदारांचा पुरस्कार देऊन सन्मान

Image
पत्रकारांच्या आर्थिक विकास महामंडळावर इंदापूरला संधी द्या - विजयसिंह मोहिते पाटील  ** इंदापुरात पत्रकार दिन सोहळ्यानिमित्त विकासाच्या भागीदारांचा पुरस्कार देऊन सन्मान  इंदापूर(प्रतिनिधी):इंदापूर येथील शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने कोरोना कालावधीत १४ हजार कुटुंबांना,सलग दोन वर्ष अन्नधान्य मोफत पुरवून,व बाविस गावांमध्ये वृक्षारोपण करून आदर्श निर्माण केला आहे.या पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांचे आदर्शवत कार्य असल्याने,शासन स्थापन करीत असलेल्या,पत्रकारांचे आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक पदी  नियुक्ती करून,त्यांचा सन्मान केल्यास, आगामी काळात राज्यातील पत्रकारांना मदत मिळवून देण्यासाठी मोठी मदत होईल,यासाठी शासनाकडे आग्रह धरणार असल्याची माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिली.          इंदापूर शहरातील डॉ.नीतू मांडके आय एम ए हाऊस सभागृहात,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने,सोमवार (ता.६ जानेवारी)रोजी पत्रकार दिन सोहळ्याचे आय...