इंदापूर येथे भव्य रक्तदान शिबिर व युवक कांग्रेस मेळावा संपन्न..!!

इंदापूर येथे भव्य रक्तदान शिबिर व काँग्रेस युवक मेळावा संपन्न..!!

 
इंदापूर प्रतिनिधी:

इंदापूर: २७ डिसेंबर २०२०.इंदापूर येथील नामदेव मंदिर या ठिकाणी सोफियान खान जमादार यांच्या अभिष्टचिंतना निमित्त भव्य रक्तदान शिबिर (दि.२६)आयोजित करण्यात आले .यामध्ये युवकांकडून २०१ रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले.
 याठिकाणी प्रदेशाध्यक्ष युवक काँग्रेसचे सत्यजित तांबे व संजय जगताप अध्यक्ष पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 
 इंदापूर तालुक्यातील काँग्रेस काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी  तालुक्यातील संघटनामध्ये रिक्त असणारी पदे भरण्यात आली असून, काही ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहेत.


या  मेळाव्यात सौ. सीमा  कल्याणकर यांची काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तसेच  रमजान अब्दुल बागवान यांची इंदापूर शहर अध्यक्षपदी तर राहुल वीर यांची इंदापूर तालुका काँग्रेस सरचिटणीसपदी,  महादेव लोंढे यांची इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या सचिव, विकास बनकर यांची युवक काँग्रेस च्या तालुका उपाध्यक्ष  .निखिल निंबाळकर यांची इंदापूर तालुका युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष, सुफियान जमादार यांची इंदापूर शहर युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमदार संजय जगताप व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या हस्ते नियुक्तीची पत्र देण्यात आली.


यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे म्हणाले की काँग्रेस हाच एक पक्ष आहे जो सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याचा काम करतो. म्हणून आम्ही पक्षांमध्ये आहे.इंदापूर शहरात काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी तयारी आहे. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यांच्यामध्ये देखील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देऊन जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.

तसेच   पुणे जिल्हा अध्यक्ष आमदार संजय जगताप यांनी सांगितले की, सर्वसामान्यांच्या परिवारासाठी व खऱ्या अर्थाने तळागाळातल्या माणसाला खरी ओळख करून सर्व सामान्य माणसाला उच्च पदापर्यंत नेणारा असा जर कोणता पक्ष असेल तर तो केवळ आणि केवळ काँग्रेस पक्षच संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी आहे. प्रदेश काँग्रेसचे लक्ष इंदापूर व इंदापुरातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर आहे. आदरणीय कै. शंकरराव पाटील यांनी काँग्रेसपक्षाच्या माध्यमातून रचनात्मक सहकाराचा खूप मोठा गाडा विस्तार आपल्या इंदापूर शहरांमध्ये केला.  आम्ही आमच्या तालुक्यामध्ये कै. शंकराव भाऊंचा आदर्श घेऊनच काँग्रेस पक्ष सहकाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थात्मक दृष्टिकोनातून वाढवण्याचा आणि त्यांची ताकद वाढवण्याचे काम केले. इंदापूर करांना सांगायचे आहे की, आज काँग्रेस पक्षाबरोबर सर्वसामान्य कुटुंबातील मुले या ठिकाणी आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व काय आहे हे महत्त्वाचे नाही .कारण प्रत्येकाची सुरुवात शून्यातूनच् होत असते. काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या मागे येथील जनतेने सक्षमपणे उभे राहावे. आम्ही सर्व ताकतीने उभे आहोत.
यावेळी प्रास्ताविक  इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी केले त्यावेळी  म्हणाले की इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेऊन इंदापूर तालुका काँग्रेस आपल्या सर्व काँग्रेस नेत्यांच्या सहकार्याने पक्ष वाडी चे काम करणार

यावेळी इंदापूर तालुक्यातील  काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरुटे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*