इंदापूर येथे भव्य रक्तदान शिबिर व युवक कांग्रेस मेळावा संपन्न..!!
इंदापूर येथे भव्य रक्तदान शिबिर व काँग्रेस युवक मेळावा संपन्न..!! इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर: २७ डिसेंबर २०२०.इंदापूर येथील नामदेव मंदिर या ठिकाणी सोफियान खान जमादार यांच्या अभिष्टचिंतना निमित्त भव्य रक्तदान शिबिर (दि.२६)आयोजित करण्यात आले .यामध्ये युवकांकडून २०१ रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले. याठिकाणी प्रदेशाध्यक्ष युवक काँग्रेसचे सत्यजित तांबे व संजय जगताप अध्यक्ष पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. इंदापूर तालुक्यातील काँग्रेस काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तालुक्यातील संघटनामध्ये रिक्त असणारी पदे भरण्यात आली असून, काही ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहेत. या मेळाव्यात सौ. सीमा कल्याणकर यांची काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तसेच रमजान अब्दुल बागवान यांची इंदापूर शहर अध्यक्षपदी तर राहुल वीर यांची इंदापूर तालुका काँग्रेस सरचिटणीसपदी, महादेव लोंढे यांची इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या सचिव, विकास बनकर ...