इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी घेतली मंत्री पदाची शपथ.
इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी घेतली मंत्री पदाची शपथ.
इंदापूर :२००इंदापूर विधानसभा निवडणूक निकाल नुकताच २३नोव्हेंबर रोजी लागला असून अटीतटीच्या लढतीत दत्तात्रय भरणे यांनी विजय मिळवत आमदाराची हॅट्रिक साधली. आमदार दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आमदार असून त्यांनी कारखान्याचे संचालक ते राज्यमंत्री पदापर्यंत वेगवेगळ्या पदावरती काम केले असून त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणल्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या माध्यमातून त्यांना मंत्रीपदी दिनांक १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे राजभवनात राज्यपालांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडली यावेळी शपथ घेतली . इंदापूर तालुक्याला आमदार दत्तात्रय भरणे यांच्या रूपाने मंत्रि मिळाले. त्यामुळे दत्तात्रय भरणे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह इंदापूर मध्ये दिसून येत आहे .
Comments
Post a Comment