तालुक्याला या कॅबिनेट मंत्री पदाचा फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करू - ना. दत्तात्रय भरणे.इंदापूर येथे नामदार दत्तात्रय भरणे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न.

तालुक्याला या कॅबिनेट मंत्री पदाचा फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करू - ना. दत्तात्रय भरणे.
इंदापूर येथे नामदार दत्तात्रय भरणे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न.
इंदापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी इंदापूर तालुक्याला कॅबिनेट मंत्री देऊन मोठी जबाबदारी दिली. त्याचा फायदा नक्कीच इंदापूर तालुक्यातील गोरगरीब माणसाला कसा होईल यासाठी माझा भविष्यात प्रयत्न राहणार आहे. आपण दिवस रात्र कष्ट करून विजय खेचून आणला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. येणाऱ्या काळा मध्ये तुम्हा सगळ्यांना कसा न्याय मिळेल. आपल्या तालुक्याला या कॅबिनेट मंत्री पदाचा फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करूया असे प्रतिपादन  ना. दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे आयोजित नागरी सत्कार समारंभ प्रसंगी सत्काराला उत्तर देताना केले.

 इंदापूर (ता -२२)महाराष्ट्र राज्याचे क्रीडा, युवककल्याण,अल्पसंखाक विकास व औकाफ मंत्रालय मंत्री ना. दत्तात्रय भरणे यांचा भव्य नागरी सत्कार इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीतील घटक पक्षाच्या वतीने  करण्यात आले.यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे, युवराज मस्के, हनुमंत कोकाटे यांनी आपली मनोगते व्यक्त करून ना. भरणे यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी महायुतीचे अनेक कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*