जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराईमळा शाळेत लोकवर्गणीतुन स्पोर्ट ड्रेसचे वाटप*
इंदापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गौराईमळा या ठिकाणी पालक व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांची गुणवत्ता ,शाळेच्या भौतिक सुविधा व यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा संदर्भाने सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती .त्यामध्ये शालेय गुणवत्ता व स्पर्धा परिक्षा तयारी बाबत श्रीम् . जुबेदा पठाण मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी मुख्याध्यापक श्री.प्रताप शिरसट सर यांनी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी खेळाला महत्त्वाचे स्थान आहे .त्यातुन मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो .त्यासाठी स्पोर्ट ड्रेस असावा ही कल्पना मांडली. त्यास सर्व पालकांनी होकार देऊन सहकार्य केले .त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अमोल नाझरकर १००० रू., उपाध्यक्ष श्री. अमोल जाधव ५०० रु., तंटामुक्तीचे अध्यक्ष तात्यासाहेब शिंगाडे १००० रु, श्री.नानासो नाझरकर १००० रु, श्री .राहुल नाझरकर १०००रु, श्री .दासा शिंगाडे ५०० रु, श्री.विठ्ठल शिंगाडे ५०० रु, श्री .सुजित शिंगाडे १००० रु, श्री .दिपक शिंगाडे १००० रु, श्री .किसन शिंगाडे १००० रु, श्री .परशुराम शिंगाडे १००० रु व राजु शेख ५०० रु यांच्या सहकार्यातून स्पोर्ट ड्रेस खरेदीसाठी देणगी जमा करण्यात आली .सर्व देणगीदारांचा शाळेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment