इंदापूर तालुका हिंदी अध्यापक संघाची नियोजन बैठक श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव येथे संपन्न*......
*इंदापूर तालुका हिंदी अध्यापक संघाची नियोजन बैठक श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव येथे संपन्न*......
इंदापूर : इंदापूर तालुका हिंदी अध्यापक संघाची स्थापना करण्यात आल्यानंतर दिनांक 20 12 2024 वार शनिवार रोजी निमगाव येथील केतकेश्वर विद्यालय येथे हिंदी अध्यापक संघाची नियोजन बैठक घेतली गेली.
या बैठकीत तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेचे तसेच वक्तृत्व स्पर्धेचे दोन गटांमध्ये नियोजन करण्यात आले आहे, यामध्ये ही स्पर्धा तीन गटांमध्ये करण्याचे ठरले आहे . या संपूर्ण स्पर्धेमध्ये इंदापूर तालुक्यातील माध्यमिक शाळा आवाहन करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालयांना सहभागासाठी पत्र देण्यात आले.
या स्पर्धेत बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. तसेच सेवानिवृत्त हिंदी अध्यापक यांचा संघाच्या वतीने सन्मान करण्याचे नियोजन करण्यात आले आणि इंदापूर तालुक्यातून आदर्श हिंदी अध्यापक म्हणून सहा पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली. यावेळी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम निमगाव येथे घेण्याचे ठरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुका हिंदी संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न कानगुडे, उपाध्यक्षा स्वप्नाली गायकवाड, तसेच महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघ सदस्य उस्मान मुलाणी, व हिंदी संघाचे सदस्य रमेश मचाले, चंद्रकांत सोळसे, सुधाकर भोंग, प्रकाश शेंडे, विलास गाढवे, राजेंद्र रणमोडे, दीपक निंबाळकर, दत्तात्रय वाघ, दिपक वडापुरे, दत्तात्रय गवळी, किसन भोंग, उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन भोंग यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वप्नाली गायकवाड मॅडम यांनी केले.
Comments
Post a Comment