वज्रेश्वरी दत्त मंदिर येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
वज्रेश्वरी दत्त मंदिर येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
इंदापूर : गोखळी ( ता. इंदापूर ) वज्रेश्वरी दत्त मंदिर मालुंजकर फार्म येथे सालाबाद प्रमाणे मालुंजकर परिवार इंदापूर यांच्यावतीने दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात अनेक भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
हिंदू धर्मात दत्त जयंतीला खास महत्त्व आहे. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एक भाग आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला भगवान दत्तांची जयंती साजरी करून पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तांचा जन्म मृगशिरा नक्षत्रावर झाला. यांना गुरुचे रूप मानले. तसेच त्यांना श्री गुरुदेव दत्त देखील म्हणून ओळखले जाते. अशा सोहळ्याचे आयोजन प्रसिद्ध आर्किटेक्ट वसंतराव माळुंजकर व त्यांच्या परिवाराच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपातील वज्रेश्वरी दत्त मंदिरात सालाबाद प्रमाणे याही वर्षी अनेक भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये, टाळ मृदुंगाच्या निनादात, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषामध्ये सायंकाळी सहा वाजता पुष्पवृष्टी करीत दत्त जन्म सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा झाला. यावेळी महिला भाविकांच्या वतीने दत्त जन्माचा पाळणा गायनात आला. दत्तात्रेय नामकरण सोहळा पार पाडण्यात आला. सर्व भाविक भक्तांना माळुंजकर परिवाराच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला.
याप्रसंगी नगरपालिका मुख्याधिकारी रमेश ढगे यांचा सहपरिवार, माजी नगराध्यक्ष अंकिताताई शहा, माजी उपनगराध्यक्ष अरविंद तात्या वाघ, इंदापूर तालुका सराफ संघटना संघाचे अध्यक्ष नरेंद्रकुमार गांधी,
तेचपृथ्वी ग्रुप अध्यक्ष अनिताताई खरात,मा नगरसेवक गजानन गवळी, मा नगरसेवक
स्वप्निल राऊत,मा नगरसेवक अनिकेत वाघ, मा नगरसेवक अमर गाडे, मा. नगरसेवक अतुल शेटे,
इंदापूर शहर व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष संदीप वाशिंबेकर, रो.नंदकुमार गुजर, डॉ. संजय हेगडे, रो धरमचंद लोढा, युवा नेते श्रीराज भरणे , युवा नेते पार्थ गारटकर, चार्टर्ड अकाउंटंट अमोल शहा, भिमानगरचे सरपंच रमेश पाटील, विराज जगताप, शुभम पवार, गौरव राऊत, व्यापारी वर्गातील मान्यवर, दुनियादारी ग्रुप सदस्य, पहाट वारा ग्रुपचे सदस्य, क्रीडाई इंदापूर सदस्य, रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे सदस्य, रोटरी क्लब ऑफ सेंट्रल इंदापूरचे सदस्य, गोखळी गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थ, तरंगवाडी गावचे ग्रामस्थ व मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते.
तर मंदिराच्या सजावटीसाठी संतोष जाधव नेताजीनगर यांनी झेंडूचे फुलांची सुंदर अशी अरास केली होती.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी माजी नगरसेविका हेमलता मालुंजकर,उद्योजक उत्तमराव मालुंजकर व परिवारातील इतर सदस्य यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment