एल.जी. बनसुडे विद्यालयाच्या प्रांगणात सजले* *उद्याचे भविष्य*

I*एल.जी. बनसुडे विद्यालयाच्या प्रांगणात सजले* *उद्याचे भविष्य*
इंदापूर पळसदेव- ( दि ११ डिसें)
येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे विद्यालयात चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. या उपक्रमाच्या माध्यमातून समाज उपयोगी  *आपले मदतनीस* हा उपक्रम घेण्यात आला.  सामुदायिक मदतनीस समाजाला  मदत करतात व आपले जीवन चांगले,सुरक्षित ,आनंदी व आरोग्यदायी ठेवण्यासाठी नेहमीच क्रियाशील असतात हे सर्व गुण भविष्यात विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी हा उपक्रम प्री प्रायमरी विभागाकडून घेण्यात आला.विद्यार्थ्यांनी शिक्षक, डॉक्टर ,शेतकरी, नर्स ,वकील ब्युटिशियन, फॅशन डिझायनर, मास्टर शेफ , भाजीवाली,पोलीस आर्मी ऑफिसर , कोळी, दूधवाला पुढारी, पायलट, एअर होस्टेल अशा वैविध्यपूर्ण भूमिका सादर केल्या. त्यावेळेस संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, कार्याध्यक्षा नंदा बनसुडे, प्रमुख पाहुणे सिंधुताई भागवत, सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे,मुख्याध्यापक राहुल वायसे, समन्वयक सुवर्णा वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील सर्व शिक्षिका निकिता गोरे, सोनाली साळवे, विजया आटपाटकर, स्नेहल गायकवाड, अंबिका बनसुडे, वसुधा नगरे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती मारकड यांनी करत देशाचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील राहतील असे सांगत कार्यक्रमाची सांगता केली.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*