अनंतराव पवार विद्यालय नीर निमगाव येथे मोफत रक्त तपासणी शिबिर संपन्न.रक्ताची कमतरता असल्यास कोणता आहार घेण्यात यावा तसेच भविष्यात येणाऱ्या आरोग्याच्या समस्यचे ा केले मार्गदर्शन.
अनंतराव पवार विद्यालय नीर निमगाव येथे मोफत रक्त तपासणी शिबिर संपन्न.
रक्ताची कमतरता असल्यास कोणता आहार घेण्यात यावा तसेच भविष्यात येणाऱ्या आरोग्याच्या समस्याचे केले मार्गदर्शन.
इंदापूर :अनंतराव पवार विद्यालय नीर निमगाव येथे मोफत रक्त तपासणी शिबिर संपन्न झाले.
मंगळवार (दि. १०) डिसेंबर २०२४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा ,आरोग्यवर्धिनी उपकेंद्र निर निमगाव आणि महा लॅब यांचे वतीने नववी व दहावीतील विद्यार्थ्यांचे रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते .
शिबिराचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष रणजीत घोगरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या शिबिरामध्ये दोन प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या
१. हिमोग्लोबिन तपासणी तांबड्या पांढऱ्या पेशीचे प्रमाण व प्लेटलेट चे प्रमाण
२. थायरॉईडची तपासणी
यावेळी रक्ताच्या चाचणीची आवश्यकता हिमोग्लोबिनचे प्रमाण.
मुलांमध्ये मुलींमध्ये वरील बाबींबाबत किती प्रमाण असावे व त्याचे फायदे आणि तोटे या संदर्भातील मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक गरगडे बी जे यांनी केले. तर रक्ताची कमतरता असल्यास कोणता आहार घेण्यात यावा तसेच भविष्यात येणाऱ्या आरोग्याच्या समस्या याबाबत निर निमगाव उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ.मेघा सस्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
महा लॅब चे बावडा येथील चिंतामणी गायकवाड यांनी शिबिर यशस्वी करण्याकरता रक्ताचे सर्व विद्यार्थ्यांचे नमुने घेतले व तपासणी केली.
यावेळी सचिन पवार, डोळे ए. एस ,व मोरे बी एम तसेच आशावर्कर मजगे ताई व जानकर ताई उपस्थित होत्या.
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष दत्ताजीराव घोगरे यांनी अभिनंदन केले.
---------------------------
फ़ोटो ओळ : अनंतराव पवार विद्यालय नीर निमगाव येथे मोफत रक्त तपासणी शिबिराप्रसंगी विद्यार्थ्यांची करण्यात आली.
Comments
Post a Comment