श्री.पळसनाथ विद्यालयात इयत्ता दहावी 2003/04 माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न*

*श्री.पळसनाथ विद्यालयात इयत्ता दहावी 2003/04 माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न*
इंदापूर :- दि. 22 श्री.पळसनाथ विद्यालयात इयत्ता दहावी 2003/04 माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून उपस्थित सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. 
           
          या कार्यक्रमाचे आयोजन किरण काळे,सोमनाथ काळे, दीपिका भिसे व इतर सर्व सहकारी यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला सुरुवात होण्याअगोदर आपल्यामध्ये जे सहकारी हयात नाहीत अर्ध्यावरती मैत्रीची साथ सोडून गेले त्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.इयत्ता दहावी सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी आपापला परिचय देऊन आपण कोणत्या पदावरती कार्यरत आहोत याची माहिती दिली. 
          
          कोणी नोकरीला आहे तर कोणी प्रगतशील बागायतदार आहे याची माहिती दिली व त्या पदावरती कार्यरत असताना सर्वांना आपापल्या खात्याअंतर्गत सहकार्य व मदत होईल असे आश्वासित केले. सर्व माजी  विद्यार्थ्यांनी शाळेत असतानाचे आपले किस्से सांगितले गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही सर्व घडलो शाळेतील सर्व जुन्या आठवणींना उजाळा दिला या सर्व माजी विद्यार्थ्यांनी पळसनाथ विद्यालयाला एक सीपीयू भेट म्हणून दिला आकाश कांबळे या माजी विद्यार्थ्यांने पळसनाथ विद्यालयासाठी पाच लाखाचा निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

      त्यानंतर सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले जे विद्यार्थी चांगल्या पदावर ती काम करत आहेत व प्रगतशील बागायतदार आहेत त्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असेच शाळेविषयी शिक्षकांविषयी स्नेह कायम राहावा असे मनोगत व्यक्त केले
         
           यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अवचर सर होते. सोबतच कोकरे सर,गोडगे सर, ढेरे सर,जाधव एसबी सर,निकम सर, बडे सर,काळे एच एम सर,यमपुरे सर आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*