इंदापूर तालुक्यातील नाभिक समाजाच्या शिष्टमंडळानेआमदार दत्तात्रय भरणे यांना मंत्रिमंडळात संधी देण्याची लेखी निवेदनाव्दारे केली मागणी.
इंदापूर तालुक्यातील नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने
इंदापूर : पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष रमेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील देवगिरी या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन इंदापूर तालुक्यातील सर्व घटकांसाठी काम करत असलेल्या विकासभिमुख नेतृत्व म्हणून राज्यात परिचित असलेले आमदार दत्तात्रय भरणे यांना मंत्रिमंडळात संधी देण्याची लेखी निवेदनाव्दारे मागणी केली. याप्रसंगी नाभिक बांधवांच्या वतीने अजित पवार यांचा २०२४ च्या निवडणुकीत उत्तुंग यश प्राप्त मिळाल्याबद्दल त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष रमेश राऊत, संघटनैचे पदाधिकारी कालिदास राऊत,बावडा येथील विनोदकुमार जाधव, संतोष राऊत, भागवत जाधव, पंकज सुर्यवंशी, दादासो खंडागळे, राहुल राऊत यांच्यासह शेकडो नाभिक बांधव उपस्थित होते.अशी माहिती कालिदास राऊत यांनी दिली.
Comments
Post a Comment