इंदापूर पोलीस स्टेशन येथे तेजपृथ्वी ग्रुप वतीने भाऊबीज साजरी.

 इंदापूर पोलीस स्टेशन येथे तेजपृथ्वी ग्रुप वतीने भाऊबीज साजरी.
     इंदापूर : नेहमी आपले  सन उत्सव जनतेच्या सेवेसाठी संरक्षणासाठी घालवणाऱ्या पोलीस बांधवांची भाऊबीज सुनी जाऊ नये पोलीस अधिकारी भाऊबीजेपासून वंचित राहू नयेत यासाठी कायम  जनतेची माय माऊलींचे संरक्षण करून आपले कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यां बरोबर भाऊबीज साजरी करून अधिकाऱ्यांना गोड असा दिपवाळी फराळ देऊन तेजपृथ्वी ग्रुपने आपले कर्तव्य आज पार पाडले. तेजपृथ्वी ग्रुप  नेहमीच सामाजिक कामातून चर्चेत असतो आणि आजही त्याची प्रचिती त्यांच्या कामातून आली. नेहमीच गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या महिलांच्या अनाथांच्या व अधिकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा तेजपृथ्वी ग्रूप  आपण समाजाच काहितरी देणे लागतो याचं भान ठेवून काम करणाऱ्या तेजपृथ्वी ग्रूपच्या पदाधिकाऱ्यांनी आज निवडणुकीच्या वातावरणामुळे पोलीस अधिकाऱ्याच्या सुट्ट्या कॅन्सल झालेले आहेत त्यांना दिपवाळीलाही घरी जाता येत नाही, आपल्या कुटुंबाबरोबर दिपवाळीचा भाऊबीजेचा आनंद घेता येत नाही हे ओळखून त्यांच्याबरोबर भाऊबीज साजरी करून अधिकाऱ्यांना फराळाचे वाटप केले. दिपवाळीच्या फराळा प्रमाणे अधिकाऱ्यांचे आयुष्य गोड होवो त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत अशा शुभेच्छा यावेळी अनिताताई खरात यांनी दिल्या, 
    यावेळी तेजपृथ्वी ग्रुपचे सद्दाम  बागवान,देविदास वाघमोडे निलेशजी धापटे तसेच पोलीस स्टाफ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*