रुईच्या मतदान पेटीचे मतदान मोजले जाईल त्यावेळी सगळे उमेदवार चक्रावून जातील - आ दत्तात्रय भरणे.

रुईच्या मतदान पेटीचे मतदान मोजले जाईल त्यावेळी सगळे उमेदवार चक्रावून जातील - आ दत्तात्रय भरणे.
इंदापूर : येत्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी मला मतदान करावे.मतदानरुपी आशिर्वाद द्यावा. ही विनंती करण्यासाठी  रुई गावात आलो आहे. रुई करांनी मला नेहमीच साथ दिली आहे. फ्कत सुखा बरोबर तुमच्या सोबत दुखः वेळी तुमच्या सोबत नाही असा स्वभाव माझा नाही. रुई करांनी माझ्यावरती खूप प्रेम करून आशीर्वाद दिलेला आहे. तुम्ही दिलेला आशीर्वाद मी कधीच विसरणार नाही. उद्या २३ तारखेला ज्यावेळी रुईच्या मतदान पेटीचे मतदान मोजले जाईल त्यावेळी सगळे उमेदवार चक्रावून जातील एवढ्या संख्येने मतदान या ठिकाणी होईल असा विश्वास महायुतीचे उमेदवार आ दत्तात्रय भरणे यांनी रुई येथे आयोजित प्रचार सभेत दि. १५रोजी व्यक्त केला.

यावेळी डॉ. शशिकांत तरंगे,गजानन वाकक्षे, दीपक जाधव,माऊली बनकर,आबासाहेब थोरात इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर प्रकाश पांढरपिसे यांनी प्रास्ताविक केले.

दरम्यान रुई गावचे पोपटराव शिदेसाचीन शिंदे, विजय पांढरपिशे, प्रकाश पांढरपिशे,रवी शिंदे, ऋषिकेश माने, विश्वजित वाघमोडे, सोनू यादव, आदित्य देवकर, यांचा पक्ष प्रवेश केला.

पुढे भरणे म्हणाले की, विकास कामासाठी  संगमनेरची पाहुणेमंडळी आली व ती म्हणाली तुम्ही मदत करा आम्ही मदत करतो.निस्त बाबीर बुवाच्या नाव घेऊन नुसता गुलाल लावायचा नसतो. त्यासाठी काहीतरी करायचं असतं. देवाला माहित आहे खरं काय आणि खोटं काय आहे. खरी माणसं कोण आणि खोटी माणसं कोण. खरं सांगतो कुणी किती निधी दिला यादी बघितल्यानंतर कळतं नुसतं नाव घ्यायचं नसतं त्यासाठी आपलं योगदान किती आहे. हो माझं योगदान आहे.योगदान म्हणजे उपकार नाही तर ते माझे कर्तव्य आहे. तालुक्याच्या विकासामध्ये जेवढं काही देता येईल व करता येईल ते मी केल आहे. उद्या शंभर वर्षे माझ्या शेतकरी पाणी कसे पुरले. अशी व्यवस्था केली पाहिजे म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी उजनी धरणा मधून शेटफळगढे येथे टाकायचं हे योजना मंजूर केली होती. योजना मंजूर झाल्यानंतर काही तालुक्यातील नेत्यांचं पित्त उसळलं. ही योजना मंजूर झाल्यानंतर लोक मामा मामा करतील. म्हणून आपल्या राजकारणात कसं होईल. यांच्या राजकारणासाठी सोलापूरकरांचा गैरसमज कोणी केला. इंदापूर तालुक्यातील लोकांनी त्यांची डोके भडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा जिवंतपणे प्रेत यात्रा काढून उजनी मध्ये बुडवले गेले. त्याचं दुःख मला नाही मला दुःख एवढच आहे ती एकदा शेतीचं पाणी गेलेलं पाणी परत मिळणार नाही. खूप मोठा तळतळाट माझ्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा लागल्याशिवाय राहणार नाही. एवढं करून ते म्हणतात की योजना मंजूर झाली नव्हती. अशा पद्धतीने त्यांनी पाणी प्रश्नावर आपले मत व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*