फक्त मतासाठी मुस्लिम समाजाचे नाव घ्यायचं. अशा लोकांपासून सावधान रहा - आ. दत्तात्रय भरणे.
फक्त मतासाठी मुस्लिम समाजाचे नाव घ्यायचं. अशा लोकांपासून सावधान रहा - आ. दत्तात्रय भरणे.
इंदापूर: निधी देताना विकासाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विकास कामाच्या बाबतीमध्ये खूप काही आपल्या परिसरासाठी आपल्या भागासाठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडे आलेल्या सर्व कार्यकर्त्याचे काम कसे होईल. हा माझा प्रयत्न असतो. माझ्याकडून सगळीच कामे झाली असतील असे नाही.जी काम माझ्या दृष्टीने करता आली माझ्या कुवतीनुसार करता आली. ती करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेली दहा वर्षांमध्ये केली आहे. आज मुस्लिम बांधव समोर आहेत.आपण राजकारण बाजूला ठेवूया आणि शांत डोक्याने विचार करूया मुस्लिम समाजाला याआधी स्पेशल निधी कधी आला होता का? हा निधी आत्ताच का आला?.विरोधक माझ्यावरती टीका करतात.मामा हे युतीचे उमेदवार आहेत. शेवटी फुले, शाहू, आंबेडकर विचार धारेवर चालणारा आमचा पक्ष आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या माध्यमातून तालुक्यातील मुस्लिम व मागासवर्गीय बांधवांची जास्तीत जास्त विकासकाम करण्याचा प्रयत्न केला. राहिलेली कामे भविष्यात करायची आहेत. विरोधक आल्यानंतर विरोधकांना विचारा की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. हा सवाल तुम्ही करा. कुठेतरी दिशाभूल करायची आणि मुस्लिम समाजाचे नाव घ्यायचं. त्या लोकांची पार्टी आहे त्या पक्षामध्ये मुस्लिम लोकांना उमेदवारीची किती तिकीटे मिळाली. आपल्या पक्षाच्या वतीने ५३ जागेपैकी सहा ते सात उमेदवारांना उमेदवारी दिली. गेल्या महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या पक्षाला राज्यपाल कोट्यातून दोन जागा मिळाल्या होत्या त्यातील एक जागा मुस्लिम समाजाला दिली. आम्ही कधीच भेदभाव करत नाही. फक्त मतासाठी मुस्लिम समाजाचे नाव घ्यायचं. ते व्हाट्सअप वरती पाठवायचं. आणि कुठेतरी काहीतरी बातम्या पसरवायच्या. मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे की अशा लोकांपासून सावधान रहा असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे आवाहन इंदापूर तालुक्यातील उद्धट येथे बुधवारी (दि. १३) आमदार भरणे हे आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना केले .
ते म्हणाले उद्धट गावासाठी काय केलं. हा सवाल विरोधक मत मागायला आल्यावर आग्रहाने विचारा. या गावातील या परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी बी के बी एन रस्ता कोणामुळे वरदान ठरला हे येथील जनतेला माहित आहे .
यावेळी भाजपचे जेष्ठ नेते तानाजी थोरात म्हणाले, इंदापूर तालुक्याला विकास काय असतो हे भरणे यांनी दाखवून दिले आहे. हजारो कोटीचा निधी इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी आणल्यामुळे कामाचा आमदार म्हणून भरणे मामांची प्रतिमा झाली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे, अमोल भोईटे, भाजपचे नेते नानासाहेब शेंडे , मा. पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकाळ, अण्णासाहेब यादव, रवीदादा कदम, सत्यवान चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment