लवकरच होणाऱ्या निवडणुक संदर्भात रणनीती आखण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी बैठकीला उपस्थित राहावे - जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे आवाहन.
इंदापूर : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला मोठया प्रमाणावर यश संपादन झाले आहे. याचं अनुषंगाने पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने पक्षाचे विजयी झालेले सर्व नवनियुक्त आमदार यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे.त्याचप्रमाणे तातडीने होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका,पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रणनीती आखणेबाबत प्रदेश कार्यालय यांच्या वतीने आलेल्या सूचनेनुसार सर्व निमंत्रित पदाधिकारी यांनी शनिवार दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता शिवस्मारक सभागृह पुणे - सातारा रोड धनकवडी* *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा कार्यालयाशेजारी पुणे येथे बैठक आयोजित केली असून जिल्हयातील सर्व प्रमूख पदाधिकारी यांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवहान पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment