पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगीची माजी विद्यार्थिनी कु. प्रज्योती बोबडे बनली सनदी लेखापाल (C.A.) .पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय तर्फे करण्यात आला कु. प्रज्योती बोबडे यांचा सत्कार .
इंदापूर: मंगळवार दि. १६ जुलै रोजी सकाळी पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगीची माजी विद्यार्थिनी कु. प्रज्योती बापूराव बोबडे सनदी लेखापाल (C.A.) जुलै २०२४ मध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली त्याबद्दल पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय तर्फे जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, प्रा. डॉ. श्री हणमंत संपतराव पोळ सर , प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूरचे इन्कम टॅक्स सल्लागार धीरज गांधी तसेच संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव, संस्थेचे विश्वस्त सभासद उपस्थित होते.
प्रथम सरस्वती आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
आलेल्या मान्यवरांचा सत्कार करून सत्कारमूर्ती "कु. प्रज्योती बापूराव बोबडे"या विद्यार्थिनीचा आणि आईचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात कु. प्रज्योती बोबडे ही आपले मत व्यक्त करताना म्हणाली की, मोठ्या कष्टातून आणि प्रयत्नातून, भरपूर अभ्यास करून यश मिळवले आहे, यामध्ये सर्व शिक्षक, पालक, आई- वडील यांचे प्रोत्साहन लाभले, शेवटी आईने मला या यशापर्यंत जाण्यासाठी साथ दिली.
प्रज्योतीची आई सौ विजया बोबडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, प्रथम खूप गरीबीत दिवस काढले, छोटा मोठा व्यवसाय केला, आणि इथपर्यंत प्रवास झाला, मधेच पतीने साथ सोडली, ते स्वर्गवासी झाले, तरी आम्ही चिकाटी सोडले नाही, मुलांना मी शिक्षणासाठी प्रोस्ताहीत केले, असा संघर्षमय प्रवास करून मुलीने जे यश मिळवले ते सांगत असताना त्यांचे मन गहिवरून आले.
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल (नाना )पवार यांनी आपले बहुमोल मार्गदर्शन केले आणि ते सनदी लेखापाल झाल्याबद्दल तिचे अभिनंदन केले.
संस्थेचे विश्वस्त सल्लागार शिवाजीराव पोळ (बापू) यांनी आपले मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, अभ्यास कसा करायचा, किती कष्ट करायचे आणि त्यामध्ये किती वेळ दिला पाहिजे तरच यश मिळू शकते हे उदाहरण म्हणजे प्रज्योती बोबडे होय.
तसेच आयकर सल्लागार धीरज गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, प्रज्योती हिने आपल्या नावाप्रमाणेच ज्योत लावली आहे, ग्रामीण भागातून यश मिळवणे सोपे नाही, त्यांनी आई आणि वडिलांचे भरपूर कौतुक केले.
संस्थेच्या विश्वस्त सौ.चारुशीला पोळ मॅडम यांनी आपले छान विचार व्यक्त केले, त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागात सुद्धा हुशार मुले आणि मुली आहेत, त्यांना योग्य मार्गदर्शन केले तर भरपूर मुले- मुली उच्च पदावर काम करताना दिसतील, त्यांनी मुलगी आणि आई यांचे खूप कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष प्रा. डॉ. हणमंत संपतराव पोळ सर यांनी आपले बहुमोल मार्गदर्शन व्यक्त केले, त्यांनी सांगितले की, त्यांच्या जीवनातील लहानपणी शिक्षणात आलेले संकट, तसेच अडचणी, त्यांना शिक्षणात दिलेली साथ या गोष्टी त्यांनी आवर्जून सांगितल्या, त्यांच्या वडिलांचे छत्र लवकर हरपल्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली होती, शिक्षणाची अडचण होती. म्हणून दोन भावांनी शेती करण्याचे ठरवले आणि दोन भावांना शिक्षणासाठी पाठवले, हे सांगताना ते खूप गहिवरले गेले होते.
त्यांचे नेहमी विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन होत असते, गावातील आणि परिसरातील जे कोणी विद्यार्थी उच्च पदावर जातात, त्यांचा ते सत्कार करून त्यांना ते प्रोत्साहित करतात, आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांना सतत प्रेरित करतात.
शेवटी प्रज्योती बोबडे चे कौतुक करून, त्यांच्या कुटुंबाने किती कष्ट केले, किती हाल सोसले, हे उदाहरण देऊन सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिरसट सर यांनी सर्वांचे आभार मानले .
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोंग सर आणि सुनील कोथेरे सर यांनी केले.
Comments
Post a Comment