तेजपृथ्वी ग्रुपने सेवा करावी मनोभावे या प्रमाणे तुकोबाच्या पालखीतील वारकऱ्यांना केळी, चहा,पाणी देत केली सेवा.

इंदापूर: संत तुकाराम महाराज यांची पालखी आज निमगाव केतकी येथून इंदापूर या ठिकाणी मुक्कामासाठी निघाली असता इंदापूर येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन झाले.
यावेळी तेजपृथ्वी ग्रुप कडून इंदापूर बारामती रोड वरती बायपासच्या जवळ केळी व चहावाटप चें नियोजन केले होते . यावेळी सामाजिक बांधिलकी जपणारे तेजपृथ्वी गृप आणि त्यांचे पदाधिकारी हे गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी वारकऱ्यांच्या सेवेमध्ये सेवा करावी मनो भावे .. यानुसार अतिशय मनोभावाने सेवेत भाग घेताना दिसून आले व वारकऱ्यांना मोफत चहा फळे वाटप केले. 
या वेळी अनिताताई खरात तेजपृथ्वी ग्रूपच्या संस्थापक अध्यक्षा समजिक कार्यकर्त्या नेहमी प्रमाणे या स्वतः चहा बनवण्यापासून सर्व वाटप अतीशय मनोभावे करताना दिसत होत्या.
तसेच तेजपृथ्वी ग्रूपचे प्रभारी सद्दामभाई बागवान मुस्लिम समाजाचे असून ही स्वतः सर्व वारकऱ्यांची सेवा अतीशय मनोभावे करत होते , यातूनच तेजपृथ्वी ग्रुप मधे सर्वधर्म समभावनेची बांधिलकी  जपत असल्याचे  दिसून येते. 

यावेळी नानासाहेब खरात,सद्दाम भाई बागवान,शांतिलाल भगत ,नारायण हरणावळ,संदीप रेडके, रूपेश वाघमोडे, लक्ष्मन वाघमोडे,अनुज कोद्रे, कोद्रे साहेब, गणेश शिंगाडे, तेजस्विनी खरात, अभिजीत रेडके, आबा ठावरे यांनी जवळजवळ २ हजार कप चहा बनवून वाटप केले.पृथ्वी ग्रुपने सेवा करावी मनोभावे या प्रमाणे तुकोबाच्या पालखीतील वारकऱ्यांना केळी, चहा,पाणी देत केली सेवा.


Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*