शाळेचा गणवेश हा एक पोशाख नाही तर तो विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासाचे प्रतीक : नरेंद्र गांधी. गांधी सराफ बारामतीकर यांच्याकडून ३१ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप.
इंदापूर(कांदलगाव): शाळेचा गणवेश हा एक पोशाख नाही तर तो विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. तो विद्यार्थ्यांना एक सन्मान देतो आणि त्यांना शाळेत एकत्रितपणे शिकवण्यासाठी प्रेरित करतो. त्यामुळे आपल्या या लहानशा प्रयत्नाने आपण त्यांना मोठी प्रेरणा देऊ शकत आहोत असे प्रतिपादन गांधी सराफ अँड कंपनी बारामतीकर चे प्रमुख नरेंद्र गांधी यांनी कांदलगाव (ता. इंदापूर )येथील जोगेश्वरी विद्या प्रतिष्ठान संचलित दादासाहेब पाटील विद्यालयात गणवेश वाटपा प्रसंगी केले.
कांदलगाव (ता. इंदापूर) येथील जोगेश्वरी विद्या प्रतिष्ठान संचलित दादासाहेब पाटील विद्यालयात इंदापूर येथील गांधी सराफ बारामतीकर यांच्याकडून ३१ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
दरम्यान गांधी सराफ यांच्या वतीने गेले बारा वर्षे विद्यालयात मोफत गणवेश वाटपाचा कार्यक्रम राबवत आहेत.
यावेळी गांधी सराफच्या प्रमुख हेमलता नरेंद्र गांधी, युवा उद्योजक तन्मय गांधी, संस्थेचे अध्यक्ष विधीज्ञ रणजीत बाबर पाटील, संस्था सचिव पांडुरंग काशीद, मुख्याध्यापक राम जमदाडे, जोगू फाटे आदी उपस्थित होते.
राजू वाघमोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर बापू ननवरे यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment