भागवत काटकर मित्र परिवाराच्या वतीने वृक्षारोपण हा चांगला उपक्रम - गटविकास अधिकारी सचिन खुडे.

इंदापूर: निसर्ग स्वतः चांगलं काम करतो. परंतु आपण त्यामध्ये घाण करतो. त्यामुळे त्याचा त्रास आपल्याला होतो. हायवेच्या कामांमध्ये अनेक झाडे उध्वस्त होतात परंतु त्या प्रमाणात झाडे लावली जात नाहीत. त्यामुळे अशी उपक्रम घेऊन झाडे लावावे लागतात. खरंतर भागवत काटकर मित्र परिवाराच्या वतीने असा चांगला उपक्रम घेतला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो अशा शब्दात  वडापुरी (ता. इंदापूर) येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून भागवत काटकर मित्र परिवार यांच्या वतीने(दिं.२०)रोजी १०० वृक्षांचे वृक्षारोपणाचा कार्यक्रम श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरामध्ये घेण्यात आला होता यावेळी  इंदापूर तालुक्याचे गट विकास अधिकारी सचिन खुडे यांनी कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूनगे, झगडेवाडीचे सरपंच तथा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पोलीस नाईक सुकुमार भोसले, ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे, भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत जगताप, शिर्के भाऊ, सोसायटीचे चेअरमन गुलाबराव पवार, व्हॉइस चेअरमन तानाजी पिंगळे,झगडेवाडीचे उपसरपंच दादाराम झगडे,  तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे, ज्येष्ठ नेते दयानंद चंदनशिवे, युवा नेते बापूराव चंदनशिवे, मा. उपसरपंच भागवत काटकर, मा. ग्रा.पं. सदस्य गणेश चंदनशिवे, मा.ग्रा.पं. सदस्य अमोल पवार,मा. ग्रा.पं. सदस्य प्रताप बागल, प्रगतशील शेतकरी विजय पवार, प्रगतशील शेतकरी दादासो जगताप, श्रीनाथ पाणी पुरवठाचे उपाध्यक्ष हरिभाऊ माने, वस्ताद किरण गोसावी,प्रगतशील शेतकरी परशुराम करगळ, श्रीनाथ बेकरीचे नलवडे,
प्रगतशील शेतकरी संतोष देशमुख,मा. सरपंच आसमा मुलानी, मा. ग्रा.प. सदस्य अंबिका बागल, रेणुका काटकर, शांता फरतडे, युवा नेते भारत चंदनशिवे, उद्योजक आशिष बर्गे, उद्योजक रहमान शेख, उद्योजक महेंद्र काटकर, युवा नेते संतोष काळे, युवा नेते प्रीतम देवकर, उद्योजक राहुल  धोत्रे, पंकज काटकर, मसू पवार, हनुमंत मोटे, पप्पू चंदनशिवे, धनंजय देवकर, प्रदीप रेडेकर, दीपक जगदाळे, धीरज काटकर, निलेश रसाळ, आप्पाजी पासगे, दीपक पासगे, सुभाष पिंगळे, मच्छिंद्र चंदनशिवे, नाना काळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच पुढे गटविकास अधिकारी सचिन खुडे म्हणाले की, कोरोना काळात ऑक्सिजनची गरज कशा पद्धतीने होती. ऑक्सीजन शिवाय लोकांचे मृत्यू झाले . त्यामुळे त्याचे उदाहरण देत. इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये माझ्या वतीने मी वडाचे झाड लावतो त्याचे संवर्धन आपण करावे असा संकल्प त्यांनी यावेळी केला व  वृक्षाची गरज का असते हे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात पाच सहा गुंठे अशी जागा असावी की त्या ठिकाणी भरपूर झाडे असावी व त्या झाडाखाली गावातील सगळी मुलं खेळत असावीत. भागवत काटकर मित्रपरिवाराच्यावतीने हा जो उपक्रम राबवला तो अत्यंत गरजेचे उपक्रम राबवला आहे. 

याप्रसंगी झगडेवाडी चे सरपंच अतुल झगडे  म्हणाले की,गुरुपौर्णिमेचे अवचित्य साधत भागवत काटकर मित्रपरिवार वडापुरी यांच्या वतीने वृक्ष लागवडीचा जो संकल्प केला आहे. तो अतिशय कौतुकास्पद आहे. पर्यावरणाची ज्या पद्धतीने आज हानी चालवली आहे. या हनीमुळे समाजाला वाईट गोष्टीला तोंड द्यावे लागत आहे. यावर चांगला आणि स्तुत्य उपक्रम या मित्र परिवाराच्या वतीने होत आहे. त्याचे खूप कौतुक वाटत आहे. खरंतर सामाजिक बांधिलकी बघून गावाशी प्रतिनिष्ठा ठेवणे. गावाच्या सार्वजनिक विकासात सामाजिक योगदान देणे हे प्रत्येक गावच्या नागरिकाचे कर्तव्य असते. या कर्तव्यातून आपल्या गावाची दिशा चांगल्या ठिकाणी जात असते. निश्चित पद्धतीने या मित्र परिवाराने चांगला संकल्प केला आणि या संकल्पची मूर्तमेढ आजच्या या चांगल्या दिवशी रोवली. असेच त्यांच्या कामाची शैली सामाजिक उपक्रमांमधून मी वेळोवेळी पहात असतो. की ज्या ज्या वेळेस समाजामध्ये सार्वजनिक उपक्रम राबवले जातात. त्या उपक्रमांमध्ये निश्चितपणे त्यांचे योगदान अतिशय चांगल्या पद्धतीने असते .खरंतर अशा व्यक्तींची आपल्या गावाला आणि समाजाला गरज असते. त्यांच्याकडे सामाजिक बांधिलकी आहे .सामाजिक बांधिलकी समजून गावात सार्वभौमिक विकास करणे हे गावच्या नागरिकाचे एक कर्तव्य असते. हे कर्तव्य पार पडत असताना ही टीम दिसत आहे. आमच्यासारख्या युवकांना आजूबाजूला आम्हाला  चांगलं वाटतं. खरंतर हे माझं गाव आहे. हे दैवत आमचेही आहे. जरी झगडेवाडी ग्रामपंचायत वेगळी झाली असली तरी वडापुरी गाव हे आमच्या हक्काचे गाव आहे. ते स्वतःच गाव म्हणून पहिल्यापासून आमच्या मनामध्ये छबी आहे. ती कुठेही कमी झालेली दिसत नाही. अशा गावांमध्ये सार्वजनिक उपक्रम होत असताना निश्चितपणे होत असताना चांगल्या पद्धतीचे कौतुक वाटते. या ठिकाणी मी शुभेच्छा देतो की अशा सार्वजनिक उपक्रमांमध्ये वेळोवेळी तुमचं सहभाग आहेच. भविष्यात देखील सार्वजनिक उपक्रम आपले मित्र परिवाराच्या वतीने माध्यमातून राबवले जावो आणि त्यांना या सार्वजनिक उपक्रम साठी सर्वांचे साथ लाभो अशा पद्धतीने आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक दयानंद चंदनशिवे यांनी केले तर सूत्रसंचालन किरण धापटे यांनी केले व आभार फरतडे सर यांनी मांनले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*