गौराईमळा शाळेत शिक्षण सप्ताहाची उत्साहात सुरूवात.*

इंदापूर: दि 23 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्त महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग मार्फत *दि 22 ते 28 जुलै 2024* शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती इंदापूर यांचे मार्गदर्शनाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराईमळा  येथे शिक्षण सप्ताहाची उत्साहात सुरूवात करण्यात आली.
        शिक्षण सप्ताहात पहिला दिवस अध्ययन अध्यापनात सहाय्यक ठरणारे साहित्य  प्राणी,पक्षी मुखवटे, तरंगचित्र,पालेभाज्या,फळे,बाजार दिवस, तक्ते  असे विविध शैक्षणिक साहित्य तयार करून घेण्यात आले. भाषा पेटीतील साहित्याचा वापर करून  विविध शैक्षणिक साहित्य प्रदर्शन मांडण्यात आले.  विद्यार्थ्यानी स्वतः साहित्य बनवले आणि  हाताळले त्याबाबत माहिती घेतली. या सप्ताहातील दुसऱ्या दिवशी  मुलभुत संख्याज्ञान व साक्षरता दिवस या दिवशी विविध गणितीय कोडी ,विविध गणितीय खेळ घेण्यात आले,थोर गणितज्ञ रामानुजन  यांची चित्रपटाच्या माध्यमातून ओळख करून दिली.तसेच निपुण प्रतिज्ञा परिपाठावेळी घेण्यात आली . ता .२४ क्रीडा दिवस , ता . २५ सांस्कृतिक दिवस ,ता . २६  कौशल्य व डिजिटल दिवस , ता .२७ इको क्लब शा पो आ दिवस ,ता.२८  समुदाय सहभाग दिवस  या प्रमाणे शिक्षण सप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे या बाबतीत  मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर  यांनी सविस्तर माहिती दिली. उपशिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी विविध शैक्षणिक साहित्य तयार करताना  मुलांचा प्रत्यक्ष  सहभाग घेतल्याने  मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला .तसेच मुलांना प्रत्यक्ष साहित्य तयार करण्याचा अनुभव मिळाला .
                  अशा  उपक्रमांमुळे मुलांना चिरकाल टिकणारे ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव मिळत असुन त्यामुळे मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास मदत  होत आहे असे मत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोलजी नाझरकर व उपाध्यक्ष अमोलजी  जाधव यांनी व्यक्त केले. या बाबतीत अंगणवाडी सेविका सुनिता जाधव मदतनीस कल्पना जाधव मॅडम यांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*