झगडेवाडी येथील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे फॉर्म हे ऑनलाईन करण्याची जबाबदारी घेतली ग्रामपंचायतीने - सरपंच अतुल झगडे यांची माहिती. दिलेले फॉर्म व कागदपत्रे गोळा करून देण्याचे केले आवाहन.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत झगडेवाडी गावातील महिलांना शनिवार व रविवार दि. 13 व 14 जुलै या दोन दिवसांमध्ये प्रत्येकांच्या घरी या योजनेचे ऑफलाईन फॉर्म पोहच करण्यातआले असून या फॉर्म वरती जी माहिती आहे ती माहिती भरून फॉर्मच्या मागच्या पेज वरती सही करून दोन दिवसात हे फॉर्म आपल्याकडून गोळा केले जातील व संपूर्ण फॉर्म हे ऑनलाईन करण्याची जबाबदारी झगडेवाडी ग्रामपंचायत घेईल असे आवाहन झगडेवाडी येथील महिलांना दगडवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अतुल झगडे यांनी केले.
तसेच ते म्हणाले की,आपण सर्वांनी फक्त त्याला लागणारी संपूर्ण कागदपत्रे त्याचा एक झेरॉक्स सेट या फॉर्म बरोबर द्यायचा आहे तसेच एक आयडेंटी फोटो ही यासोबत द्यायचा आहे तसेच याबरोबर लागणारी कागदपत्रांची यादी खाली पाठवत आहे तरी कोणीही धावपळ न करता अशा पद्धतीने नियोजन करावे ही विनंती ग्रामपंचायत स्तरावरून माझ्या गावातील माता-भगिनींना सर्व ते सहकार्य होईल .
सदर कागदपत्रे खालील प्रमाणे.
1-आधार कार्ड झेरॉक्स
2-अधिवास प्रमाणपत्र/ जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला /15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड /15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड ( यापैकी कोणतेही एक )
3- उत्पन्न दाखला/ पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड
4- अर्जदाराचे हमीपत्र
5- बँक पासबुक
6- अर्जदाराचा फोटो
*सरपंच/ ग्रामसेवक/ ग्रामपंचायत सदस्य / ग्रामपंचायत झगडेवाडी*
Comments
Post a Comment