विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्निक इंदापूर, महाविद्यालयात मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण.ना. अजित पवार यांचा वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात मुलींना दिली माहिती

इंदापूर:   महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री   ना. अजित पवार यांचा वाढदिवस विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्निक महाविद्यालयात दिनांक २३ जुलै २०२४ रोजी साजरा  करण्यात आला. 
या प्रसंगी घेतलेल्या कार्यक्रमात, राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळणार आहे. या विषयाची माहिती महाविद्यालयातील मुलींना देण्यात आली.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून राज्यातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत.या करिता मुलींना मोफत उच्च शिक्षण, यासंदर्भतील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयाला  मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून सोमवारी यासंदर्भतील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
या शासन निर्णयाची महाविद्यालयांत अंमलबजावणी करण्याकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक  सचिन सावंत यांची नोडल ऑफिसर (शिष्यवृत्ती विभाग ) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

 या प्रसंगी बोलताना  सावंत सर म्हणाले कि, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) तसेच, इतर मागास प्रवर्गातील (OBC) मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के ऐवजी १०० टक्के शिक्षण शुल्क संदर्भातील  शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.या निर्णयामुळे राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळणार आहे. मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस, शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) (व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यापैकी, ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या (अर्जाचे नुतनीकरण केलेल्या) मुलींना, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के लाभा ऐवजी १०० टक्के लाभ देण्यास येणार आहे.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुजय देशपांडे. विद्यार्थीना संबोधीत करताना ते म्हणाले कि यासाठी येणाऱ्या रु ९०६ कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आली आहे. विद्यार्थीना या शासन निर्णयाचा फ़ायदा होणार असून त्यांनी १०० टक्के महाविद्यालयात हजर राहून तसेच अभ्यास करून हा शासन निर्णय योग्य आहे हे सिद्ध करावे असे आवाहन केले. महाविद्यालयातर्फे विद्यार्थिनींना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला व या शासन निर्णयाचे स्वागत करण्यात आले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यपिका सोनाली काळे यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील २३४ विद्यार्थिनी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते.  या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ना अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*