महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कौठळी शाळेतील मुलांना खाऊवाटप.
इंदापूर: दिनांक २२ जुलै-अन्यायाची चीड व न्यायाची चाड हे ब्रीदवाक्य घेऊन अत्यंत प्रामाणिक आणि सनदशीर मार्गाने अखंड महाराष्ट्रातील शिक्षक बंधू भगिनींच्या न्याय हक्कासाठी आणि गोरगरीब बहुजन विद्यार्थ्यांचे भविष्य टिकवण्यासाठी अखंड कार्यरत असलेली संपूर्ण महाराष्ट्रातील शासनमान्य अग्रेसर शिक्षक संघटना अर्थात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.याच शिक्षक समितीच्या ६२ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कौठळी शाळेतील सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी भारत ननवरे,आरती गायकवाड, अमित भोंग उपस्थित होते.या उपक्रमाचे कौतूक शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, पुणे जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील वाघ,इंदापूर शिक्षक समितीचे नूतन अध्यक्ष सुनील शिंदे यांनी केले.
Comments
Post a Comment