जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती गलांडवाडी नंबर २ आणि गागरगाव येथे शालेय साहित्याचे वाटप. आयरीम या सामाजिक संस्थेचे सदस्य किसन गुंजाळ , शर्मिला गुंजाळ , मयूरेश दादासाहेब गुंजाळ पुणे, यांच्यातर्फे करण्यात आले वाटप.

इंदापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदम वस्ती गलांडवाडी नंबर 2  आणि गागरगाव येथे  IREAM या सामाजिक संस्थेचे सदस्य किसन गुंजाळ , शर्मिला गुंजाळ , मयूरेश दादासाहेब गुंजाळ  पुणे, यांच्यातर्फे शाळेतील मुलांना दप्तर , टिफिन बॅग यांचे वाटप करण्यात आले 
तसेच इंदापूर येथील अभिजीत मशिनरी चे मालक संतोष जाधव यांच्यातर्फे मुलांना वही पेन पेन्सिल आणि खाऊवाटप करण्यात आले , अभिजीत मशिनरी इंदापूर यांचे मालक संतोष जाधव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
 IREAM   ही एक सामाजिक संस्था शिक्षणावरती काम करणारी संस्था आहे या संस्थेचा दरवर्षी घागरगाव आणि कदम वस्ती गलांडवाडी नंबर 2 या ठिकाणी मुलांना शैक्षणिक साहित्याचा वाटप केले जाते.या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापक वसंत फलफले यांनी प्रास्ताविक केले तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जाधव हे उपस्थित होते याप्रसंगी शाळेच्या उपशिक्षिका सारिका भोंग यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*