शिक्षक समितीच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप..
इंदापूर : दि.९ जुलै २०२४-शिक्षक समिती निमगाव केतकी यांचे वतीने जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांना अल्पोपहार वाटप करण्यात आले. गेली दहा वर्षापासून अखंडितपणे शिक्षक समिती परिवारातील प्राथमिक शिक्षकांनी हा उपक्रम सुरू ठेवला आहे. शैक्षणिक सेवेसोबत वैष्णव भक्तांची सेवा करण्याचा आनंद काही औरच असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन किरण म्हेत्रे , अरूण मिरगणे , संचालक प्रताप शिरसट , शिक्षक समिती कोषाध्यक्ष भारत ननवरे ,जुनी पेन्शन संघटनेचे मा. अध्यक्ष संतोष हेगडे,नवनाथ जाधव , सुरेश धारूरकर , अजिनाथ आदलिंग , राजेंद्र काळेल , शिवाजी जाधव , भुषण जौंजाळ , राजू भोंग , किरण लंगोटे उपस्थित होते.*
Comments
Post a Comment