अपघातग्रस्त महिलेच्या उपचाराची प्रवीण माने यांनी केली तात्काळ सोय.पावसामुळे रस्ते ओले व निसरडे झालेले आहेत त्यामुळे सुरक्षिततला प्राधान्य देऊन प्रवास करावा - प्रवीण माने.

इंदापूर  : अपघातग्रस्त दुचाकीवरील बेशुद्ध पडलेल्या महिलेची तात्काळ दखल घेत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी तातडीने रुग्णावाहिकेची व्यवस्था करुन तिच्या उपचाराची सोय केली.माने हे कामानिमित्त इंदापूर बेडशिंगे रस्त्याने जात असताना  रस्त्याच्या कडेला बघ्यांची
गर्दी दिसली. प्रत्यक्ष पाहिल्यानंतर एक दुचाकी अपघातग्रस्त झाल्याचे व दुचाकीवरील महिला बाजुला फेकली गेल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी वेळ न लावता रुग्णवाहिका बोलावून घेत त्या महिलेच्या उपचाराची तातडीने सोय केली.
-----------------------
चौकट: पावसामुळे रस्ते ओले व निसरडे झालेले आहेत त्यामुळे सुरक्षिततला प्राधान्य देऊन प्रवास करावा - 
 प्रवीण माने. 
    सध्या पावसामुळे रस्ते ओले व निसरडे झालेले आहेत. अपघातांची शक्यता बळावली आहे. जीव हा मौल्यवान आहे.त्यामुळे सुरक्षिततेला प्राधान्य देऊन प्रवास करावा. जेवढी आसनक्षमता आहे, तेवढ्याच लोकांनी दुचाकी, चारचाकीवरुन प्रवास करावा.: प्रवीण माने ,माजी जिल्हा परिषद सदस्य. 

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*