हर्षवर्धन पाटील बावडा येथे रत्नाई निवासस्थानी गुरुवारी साधणार जनतेशी संवाद!
दि.17/7/24.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन (भाऊ) पाटील हे बावडा येथे रत्नाई निवासस्थानी गुरुवारी (दि.18) सकाळी 8 वा. पासून जनता व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे जनतेचे विविध प्रश्न, अडचणी जागेवर मार्गी लावत आहेत. यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो तसेच दूध संघामध्ये वेळोवेळी झालेल्या संवाद कार्यक्रमांना जनतेचा उत्स्फूर्त परिसर लाभला आहे. बावडा येथे गुरुवारी होणाऱ्या सुसंवाद कार्यक्रमाचा लाभ जनतेने घ्यावा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील संपर्क कार्यालय इंदापूर यांचेकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment