इंदापूर येथे कै. मारुती सोनवणे (पाटील) मित्र परिवार यांच्या वतीने दहा वर्षापासून वैष्णवांना मोफत अन्नदानाची सेवा.
इंदापूर : इंदापूर (साठेनगर) येथील कै. मारुती सोनवणे (पाटील) मित्र परिवार यांच्या वतीने सलग दहा वर्षापासून सुरू असलेली जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना मोफत अन्नदानाची सेवा यावर्षी देखील संपन्न झाली.
दि.10 रोजी इंदापूर शहरात संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळयाचा एक दिवस मुक्काम असतो. इंदापूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथील स्वर्गीय कै.मारुती सोनवणे (पाटील) मित्र परिवार यांच्या वतीने वारकऱ्यांना चहा नाष्ट्या व जेवणाची सोय करण्यात आली होती यावेळी शेकडो वारकरी बांधवांनी याचा लाभ घेतला अशी माहिती इंदापूर नगरपरिषदेचे मा.नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर शहर कार्याध्यक्ष दादासाहेब सोनवणे यांनी दिली.
तसेच मा.नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर शहर कार्याध्यक्ष दादासाहेब सोनवणे हे दहा वर्षा पासुन हा उपक्रम राबवत आहेत.
यावेळी चंदु सोनवणे,बाळासाहेब आडसुळ,मुकिंद शिंदे,राजू शिंदे विलास सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, विकास सोनवणे, सागर सोनवणे, समिर सोनवणे, दिग्विजय सोनवणे, सनी सोनवणे, मिलन सोनवणे, अजय सोनवणे, रवी सोनवणे, सुमित आरडे, सोमनाथ खंडाळे,अक्षय कुचेकर,अभिषेक कुचेकर, किशोर ढावरे यांनी परिश्रम घेतले
Comments
Post a Comment