कामधेनु सेवा परिवारातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप .

इंदापूर : दिं १८ . o७ . 202४ रोजी गौतमेश्वर माध्यमिक विद्यालयातील अनाथ विद्यार्थ्यांना बावडा येथील डॉ आजबे ( पशुवैद्यकिय डॉ ) यांच्या अध्यक्षतेखाली चालविलेल्या कामधेनु सेवा परिवारातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले . यावेळी डॉ . काळे  ( पशुवैद्यकिय डॉ ) गोतंडी हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते सर्व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले . त्यावेळी डॉ काळे म्हणाले आपण समाजाचे काही देणे लागतो त्या ऋणातून मुक्त होण्याचा हा एक मार्ग आहे त्या ऋणातून उतराई होण्याचा हा आपल्या कामधेनु सेवा परिवाराचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि आम्ही त्या परिवाराचे सभासद आहोत हे आमचे भाग्य आहे . यापुढे या अनाथ विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश वाटप करण्यात येणार आहे . यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री धनाजी मोरे सर यांनी कामधेनू सेवा परिवाराचे व त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले . विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल त्यांचे आभार मानले व त्यांना धन्यवाद दिले . त्यांच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सावंत सर यांनी केले . यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*