तालुक्यातील जी ग्रामपंचायत प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे फॉर्म १००% गोळा करेल. त्या ग्रामपंचायतला महिला अस्मिता भवन ताबडतोब मंजूर करणार - आमदार दत्तात्रय भरणे.आमदार दत्तात्रय भरणे यांनी लाखेवाडीत एका महिलेचा स्वतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून केला शुभारंभ.
इंदापूर: इंदापूर तालुक्यात जी ग्रामपंचायत प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म १००% गोळा करेल. त्या ग्रामपंचायतला महिला अस्मिता भवनासाठी १५ लाख रुपये ताबडतोब मंजूर केले जातील. असे आश्वासन आमदार दत्तात्रय भरणे यांनी लाखेवाडी येथील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना दिले.
या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, तहसीलदार श्रीकांत पाटील, गट विकास अधिकारी सचिन खुडे, माजी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, सुभाष डरंगे, सरपंच चित्रलेखा ढोले, उपसरपंच चंदाराणी जामदार,ग्रामपंचायत सदस्य व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
तसेच आमदार भरणे पुढे म्हणाले की, लाखेवाडी गावातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांचा फॉर्म भरून घेण्यासंदर्भात सरपंच चित्रलेखा ढोले यांनी आठ दिवसात गावातील सर्व महिलांचे फॉर्म भरण्यासंदर्भात दिलेल्या आश्वासनाबाबत त्यांचे व त्यांच्या सर्व टीमचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आभार मानत पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ज्यांनी ही योजना महिलांसाठी आणली . राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सगळ्या महिलांना एक आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून राज्यातील महिलांना महिना पंधराशे रुपये मिळावे म्हणूनही योजना आणली .तालुक्यात साधारणता एक लाखापेक्षा जास्त या योजनेची लाभार्थी होतील आणि यानिमित्ताने तालुक्याला महिन्याला पंधरा कोटी रुपये मिळणार आहेत. साधारणता वर्षाला १८० कोटी ते २०० कोटी रुपये मिळणार आहेत तसेच यांना वर्षातून ३ गॅस सिलेंडर मिळणार आहेत तसेच बचत गटाला ३० हजार रुपये खेळते भांडवल मिळत आहे. या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रत्येक वर्षी शासनाच्या वतीने ४६ हजार कोटी रुपये लागणार आहेत. माझ्या महिला भगिनींना डोळ्यासमोर ठेवून शासनाने अर्थसंकल्प सादर केलेला आहे. या योजना पासून तालुक्यातील कुठलीही महिला वंचित राहता कामा नये या माध्यमातून एखाद्या महिलेला परमेश्वराकडे पाहून मदत केली पाहिजे. .
यावेळी प्रास्ताविक भाषणांमध्ये चित्रलेखा ढोले म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि आमदार दत्तात्रय भरने यांच्या माध्यमातून लाखेवाडीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा शुभारंभ झालेला आहे. महिलांना एका छताखाली योजने संदर्भात जे काही कागदपत्रे लागतील त्याची त्यासंदर्भात नियोजन करून या कार्यक्रमाचे आयोजन केले लाखेवाडी सुमारे १६०० महिलांना लाभ मिळणार असून जवळजवळ २ कोटी ८८ लाख रुपये लाखेवाडीतील महिलांना शासनामार्फत मिळणार असल्याचे ढोले यांनी नमूद केले .
त्या पुढे म्हणाल्या की, या योजना ही शासन राबवत असून त्याचा लाभ घेऊन जास्त भाग घेतला पाहिजे तसेच याच महिलांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत त्यामुळे शासनाने दिलेल्या योजनेची जाणीव ठेवून आपण लाभ घ्यायचा आहे. सरकारच्या माध्यमातून विविध योजनेतून लोकांना योग्य ती मदत करण्यासाठी व त्यांचे प्रपंच सावरण्यासाठी त्यांच्या भविष्यकाळ यासाठी प्रोत्साहन पर योजना लाभ मिळत आहे .यातून असे वाटते की ,आपणही आपल्या प्रपंचासाठी प्रयत्न केले पाहिजे .आपल्या जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत .मी ग्रामपंचायतच्या वतीने व सर्वांच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे महिलांना जास्तीत जास्त लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे. कालपर्यंत पावणेचारशे पर्यंत फॉर्म भरून झाले होते तर सकाळपासून अडीचशे फॉर्म भरून झाले आहेत जवळपास ६५० फार्म उपलब्ध झाले असून त्याची ऑनलाइन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कॉम्प्युटर ऑपरेटर, रेशन दुकानदार, तलाठी कार्यालयातील व बँकेतील पोस्टातील कर्मचारी यावेळी उपस्थित असून सर्व यंत्रणा चालू आहे. या सर्व जणांचा सहभाग नोंदवून आपल्या योजना पूर्ण करीत आहेत .यापुढे या योजनेचे काम चालू राहील. आठवडाभरात १६०० महिला ंचे फॉर्म भरून होतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
-----------++
चौकट: लाखेवाडीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी एका छताखाली महिलांसाठी ऑनलाईन मदत कक्ष, ऑनलाइन अर्ज भरण्याची व्यवस्था, ऑफलाईन अर्ज स्वीकृती, मोफत बँक खाते उघडण्याचे कक्ष, संजय गांधी निराधार योजना, रेशन दुकानदार कक्ष, तलाठी कक्ष अशा पद्धतीने व्यवस्था केली होती. यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, सरपंच चित्रलेखा ढोले,उपसरपंच चंदाराणी जामदार, ग्रामपंचायत सदस्य व शासकीय कर्मचारी यांनी व्यवस्थित नियोजन केल्याचे दिसून आले.
Comments
Post a Comment