सुर्वे समितीचा अहवाल प्राप्त झाला - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या लक्षवेधी दरम्यान विधानसभेत दिले उत्तर.
इंदापूर :- विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या शेती सिंचनाच्या हक्काच्या पाण्यासाठी तसेच सणसर जोड कालव्याच्या पाण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी मुद्दा उपस्थित केला . यासंदर्भात 3 जुलै रोजी विधिमंडळात जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारात इंदापूरच्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी द्या. अशी आग्रही मागणी श्री भरणे यांनी विधिमंडळात अधिवेशनादरम्यान केली.
विधिमंडळात लक्षवेधी प्रश्न मांडत आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की "खडकवासला प्रकल्पातून पुणे शहराला मंजूर असलेल्या पाणी वापराच्या कोट्यापेक्षा सध्या जास्त पाणी पिण्यासाठी दिले जात आहे. याचा सर्वाधिक परिणाम या प्रकल्पातून शेती सिंचनासाठी काढण्यात आलेल्या उजवा खडकवासला कालव्याद्वारे सिंचित होत असलेल्या इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनावरती होत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्याला हक्काचे पाणी मिळण्यासाठी शासन स्तरावरून ज्या उपाय योजना करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्या संदर्भात मुद्दे उपस्थित करत बैठकी संदर्भातही आमदार दत्तात्रय भरणे यांनी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच प्रश्न विचारले.
यात प्रामुख्याने टाटा धरणाचे पाणी वळवून ते कधी इंदापूरच्या शेती सिंचनाला देण्यात येणार आहे. याचा खुलासा करावा. तसेच या संदर्भात नेमलेल्या सुर्वे समितीच्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या किंवा नाही या संदर्भात प्रश्न विचारला .
यानुसार सुर्वे समितीचा अहवाल प्राप्त झालेला आहे. काही गोष्टी सांगितल्या आहेत परंतु त्यातला महत्त्वाचा विषय हा आहे की,जे काही आपल्याला लवादाने पाणी दिलेला आहे. त्यामध्ये लवादाने ज्या काही अटी आणि शर्ती दिलेले आहेत. त्या अटी शर्तीचा भंग केल्यास लवाद कमी करतो. म्हणून आता ज्या काही उपाययोजना आपण करतो आहोत. आपण लवादाशी बोलून पिण्याच्या पाण्याकरता वळू शकतो का या संदर्भात चर्चा मागच्या काळात अजित पवार व आम्ही सगळे बसलो होतो त्यातून कायदेशीर उपाय योजना ज्या काही काढता येईल जेणेकरून आपलं हक्क देखील उद्या कुठल्या दुसरं कोणी बाजूच्या राज्याने तक्रार केली त्यांनी दिलेल्या वापरापेक्षा पाणी वापर दुसऱ्यासाठी केला ते पाणी कमी करते म्हणून त्या दृष्टीने निश्चितपणे त्यासंदर्भातली कारवाई आणि आपण जे काही बैठकीचे म्हटले ते आपण लवकर घेऊ अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिली.
Comments
Post a Comment