चाकाटीत रात्री अकरा वाजता विहिरीतून बाहेर काढत उदरमांजराला रेस्क्यु टिमकडून जिवदान .
इंदापूर (दि.४) - इंदापूर तालुक्यातील चाकाटी येथे बापुराव जाधव यांच्या विहिरीध्ये दि.१ जुलै रोजी मादी जातीचे उदमांजर शिकारीच्या शोधात असताना ५० फूट विहिरीत पडले चार दिवस बाहेर काढण्याचे प्रयत्न करूनही मांजर बाहेर येत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून इंदापूरचे वनअधिकारी सुर्यवंशी यांना फोनवरून माहिती दिलीअसता त्यांनी तातडीने दखल घेत बारामती व दौंडच्या रेस्क्यु टिमला माहिती देऊन बचावकार्यासाठी बोलावले. टिमचे सदस्य नचिकेत अवधानी , श्रेयस कांबळे, प्रशांत कौलकर , ऋषिकेश मोरे, अक्षय बोराटे, गणेश शेंगळे यांनी २ तास अथक प्रयत्न करून रात्री ११ वा. उदमांजरास विहिरीबाहेर काढण्यात यश आले.
------------------------------------
चौकट- :
रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट हि संस्था पुर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून जखमी किंवा अनाथ वन्य पशुपक्षांना रेस्क्यु करून त्यांच्यावर उपचार करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करते, असे अनाथ वन्य पशुपक्षी कोणाला आढळून आल्यास टिम रेस्क्यु यांचेशी संपर्क करावा संपर्क क्र. ९१७२५१११०० अशी विनंती टिमच्या सदस्यांनी केली.
Comments
Post a Comment