नेटवर्क वरून घेतलेल्या मोबाईल नंबरने चुकलेला वारकऱ्याला शोधण्यास आले यश. वडापुरीचे शिवाजी तरंगे यांचा वारकऱ्यांनी आभार मानून केले विशेष कौतुक.
इंदापूर: दि १७ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकवटले असताना श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील एक वारकरी दिपक अंबादास काळे (वय ४५)रा. जोंधळवाडी, ता. नांदगाव जि. नाशिक काही प्रमाणात मानसिक रुग्ण असूनही ते त्यांच्या नातेवाईकाबरोबर वारीला पायी पंढरपूर येथे आले होते. त्याचे औषधे गेली पंधरा दिवस चुकल्यामुळे मानसिक संतुलन बिघडले व ते सरळ पंढरपूर वरून वडापुरी येथे चुकून पायी चालत आले. रात्रीच्या नऊ वाजल्या होत्या. यावेळी त्यांच्याकडे मोबाईल होता परंतु त्याच्यामध्ये फोन करण्यासाठी पुरेशे पैसे नसल्याने ते फोन करू शकले नाहीत. शिवाय त्यांच्या भावाने दीपक काळे यांच्या मोबाईल वरती संपर्क साधला असता त्यांनी वडापुरी येथे श्रीनाथ मंदिराशेजारी असल्याचे सांगितले.यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी नेटवर्क वरून वडापुरी येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष व सरपंच प्रतिनिधी शिवाजी तरंगे यांचा मोबाईल नंबर सापडला असता त्यांनी सदर नंबर वरती संपर्क साधला व रस्ता चुकलेल्या त्या वारकऱ्यास शोधण्यासाठी सांगितले.
लागलीच तरंगे यांनी गावातील किशोर डावरे यांना शोधण्यास सांगितले परंतु रात्रीच्या वेळी ते सापडले नाहीत. त्यानंतर सकाळी त्यांना शोधण्यास यश आले. यानंतर शिवाजी तरंगे यांनी सदर वारकरी दीपक काळे यांना आपल्या घरी घेऊन जाऊन त्यांची अंघोळ ची सोय केली व कपडे स्वच्छ करून त्यांना जेवण पाहुणचार केला.
यावेळी दीपक काळे यांचे भाऊ अशोक काळे हे तरंगे यांच्या संपर्कात राहिले व त्यांनी लागलीच पंढरपूर वरून इंदापूर एसटीने इंदापूरला एसटी स्टँड वरती आले. तत्पूर्वी एसटीमध्ये त्यांची भावासाठी चाललेली घालमेल पाहून एसटीतील पंढरपूर वरून इंदापूर कडे आलेले त्यांच्याबरोबरचे भाविक वारकरी यांनी हळहळ व्यक्त करत सदर व्यक्ती सापडले असल्याचे व सुरक्षित असल्याचे त्यांना कळाल्यामुळे इंदापूर येथे आल्यानंतर तात्काळ हे सर्व भाविक व चुकलेल्या वारकऱ्याचा भाऊ इंदापूर येथे भेटण्यासाठी आले.
यामध्ये बाळू पवार जोंधळवाडी, जयश्री कुसेकर देवकरवाडी दौंड तालुका, मनीषा राजेंद्र दरेकर उरुळी कांचन, सुनिता विजय तम्हाणे दौंड, नवनाथ वावळ मलटण शिरूर व इंदापूर स्टॅन्ड वरील हॉटेल चालक सागर सूर्यवंशी, किशोर डावरे, मारुती बंडगर हे सर्व एकत्र येऊन चुकलेले वारकरी दीपक काळे यांना त्यांच्या भावाच्या ताब्यात दिले व यावेळी कोणीही कोणाच्या नात्याचे नसतानाही इतर महिला भाविक ही या सर्वांचा भेटीचा प्रसंग पाहून येथे आलेल्या सर्वांच्या डोळ्यांमध्ये आनंद अश्रू दिसले. यावेळी त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता अशी स्थिती काळे यांची झाली होती. यावेळी शिवाजी तरंगे यांनी सर्वांना चहा पाणी देऊन निरोप दिला.
Comments
Post a Comment