एन. ई.एस. हायस्कूल निमसाखरची माजी विद्यार्थिनी कुमारी प्रज्योती बापूराव बोबडे ही सनदी लेखापाल (सी.ए.) झाल्याबद्दल केला सन्मान.
इंदापूर: निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे एन. ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे आज एन. ई.एस. हायस्कूल निमसाखरची माजी विद्यार्थिनी कुमारी प्रज्योती बापूराव बोबडे ही सनदी लेखापाल (सी.ए.) झाल्याबद्दल संस्था व विद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ व बुके देऊन संस्थेचे सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रणवरे सर पर्यवेक्षक मधुकर खरात सर व कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते. त्यावेळी संस्था सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे म्हणाले की, आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी प्रज्योती बापूराव बोबडे हिचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. तिने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून आपल्या वडिलांनी दिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न व मेहनत केली. आज तिचे वडील हयात नाहीत तरीदेखील आई व गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली तिने तिच्या वडिलांचे सी ए.होण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवले. हीच जिद्द आत्मविश्वास, आणि चिकाटी आपण सर्व विद्यार्थ्यांनी अंगी बाळगली पाहिजे. शाळेचा नावलौकिक उंचावला पाहिजे. कसलेही संकटाला न डगमगता समोरे गेले पाहिजे असा मोलाचा मंत्र त्यांनी दिला.प्रज्योतीने भावी आयुष्यामध्ये या आव्हानात्मक क्षेत्रामध्ये प्रमाणिक कार्य करावे असे मत व्यक्त केले व तिला भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून, निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करत प्रज्योतीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या तिच्या आईचे मनापासून अभिनंदन व कौतुक केले. ही विद्यार्थिनी खरोखर आपल्या विद्यालयाची व येथील सर्व शिक्षक बंधू भगिनी ने केलेल्या कष्टाची, घेतलेल्या परिश्रमाची खरोखर पोहच पावती आहे. आगामी काळात देखील असे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये चमकतील असे मत प्राचार्य चंद्रकांत रणवरे यांनी व्यक्त केले. व तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोमनाथ चौधर सर यांनी तिच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला व तीने मिळवलेले यश आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे व आम्हा सर्व शिक्षक बंधू भगिनींची समाधानाने व आनंदाने मान उंचावणारी बाब आहे.प्रज्योतीची आई म्हणाली की, माझ्या मुलीने अतिशय मेहनतीने व रात्रंदिवस अभ्यास करून यश मिळवण्याचा मला आनंद आहे, माझा मुलगा व अजून एक मुलगी अशाच प्रकारचे यश प्राप्त करतील याची मला आशा आहे. या विद्यालयाने केलेल्या सत्काराने खरोखरच मी भारावून गेले. मी देखील याच विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. इयत्ता दहावीच्या व बारावीच्या परीक्षेमध्ये याच विद्यालयामध्ये प्रथम क्रमांकाने पास झालेली होते. मला खरोखरच या शाळेचा खूप अभिमान आहे. येथील शिक्षण खरोखरच दर्जेदार आहे. माझ्या मुलीसारखे अनेक विद्यार्थी या शाळेतून घडतील मला सार्थ विश्वास उत्तरोत्तर या विद्यालयाची अशीच प्रगती व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.प्रज्योती आपल्या भाषणात म्हणाली की, माझे वडील हयात नसताना देखील मला आईने कुठल्याही पद्धतीची कमतरता भासू दिली नाही, आईची व गुरुजनांची नेहमीच शाबासकीची थाप मला मिळत गेली. नक्कीच या सर्वांच्या आशीर्वादाने माझे भविष्य खूप जबाबदारीने व परिस्थितीची जाणीव ठेवून जगेल. मला या शाळेने दिलेली शिकवण आयुष्यात कधीच विसरणार नाही, त्याबद्दल मी येथील गुरुवर्य यांचे मनापासून आभार मानते. व आज जो माझा सन्मान केला त्याबद्दल संस्था व विद्यालय, प्राचार्य ,पर्यवेक्षक विभाग प्रमुख, व येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींचे मनापासून आभार मानते. सांस्कृतिक विभागाने कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजिनाथ मलगुंडे सर यांनी केले. अशी माहिती प्राचार्य चंद्रकांत रणवरे यांनी दिली.
Comments
Post a Comment