बांडेवाडी शाळेत शिक्षण सप्ताहाची उत्साहात सुरूवात.**शिक्षण सप्ताहातील पहिल्या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य प्रदर्शन.*
इंदापूर: दि 22 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्त महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग मार्फत *दि 22 ते 28 जुलै 2024* शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती इंदापूर यांचे मार्गदर्शनाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांडेवाडी येथे शिक्षण सप्ताहाची उत्साहात सुरूवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित पालकांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या *शिक्षण सप्ताहात पहिला दिवस अध्ययन अध्यापन साहित्य दिवस साजरा करण्यात आली विविध शैक्षणिक साहित्य प्रदर्शन मांडण्यात आले.* विद्यार्थी व पालकांनी शैक्षणिक साहित्य हाताळले त्याबाबत माहिती घेतली. या सप्ताहातील मुलभुत संख्याज्ञान दिवस , क्रीडा दिवस , सांस्कृतिक दिवस , कौशल्य व डिजिटल दिवस , इको क्लब शा पो आ दिवस , समुदाय सहभाग याविषयी मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी सविस्तर माहिती दिली. उपशिक्षिका कांचन रणपिसे , अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले , मदतनीस उर्मिला बांडे यांनी आयोजन केले.
यावेळी सारिका बांडे , अनिता जावळे महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment