पडस्थळ येथे अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते अर्ज नोंदणी अभियानाचा शुभारंभ

इंदापूर : प्रतिनिधी दि.17/7/24
                     पडस्थळ (ता. इंदापूर) येथे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेसाठी अर्ज नोंदणी अभियानाचा शुभारंभ पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी (दि.17) करण्यात आला. या योजनेच्या लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहू नये, असे आवाहन यावेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी केले.
         इंदापूर तालुक्यामध्ये या योजनेत महिलांच्या सहभागासाठी मोफत अर्ज नोंदणी अभियान राबविला जात आहे, असे अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले. या अर्ज नोंदणी अभियानासाठी पडस्थळ येथील नवचेतना महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा रेश्मा महेंद्र रेडके, सचिव स्वाती नवनाथ कोळेकर, कोषाध्यक्षा रुक्मिणी हेमंत झेंडे, सीआरएफ अमृता ईश्वर बोंगाणे, लिपिका नयना रेवन गव्हाणे तसेच सखी, जिजाऊ, स्त्रीशक्ती, राजनंदिनी, सावित्रीबाई, संत निरंकारी, भिमाई, सोयरा, तुळजाभवानी, जोगेश्वरी,आदिशक्ती, प्राजक्ता आदी महिला स्वयंसहाय्यता समूह परिश्रम घेत आहेत.
__________________________
फोटो:- पडस्थळ येथे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'  योजनेच्या अर्ज नोंदणी अभियान शुभारंभ प्रसंगी अंकिता पाटील ठाकरे.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*