एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे श्री संत संतराज महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागत.विद्यालयातील मुलांनी व मुलींनी वारकरी वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

इंदापूर (निमसाखर): निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे संचलित, एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर,ता. इंदापूर जि. पुणे, येथे श्री संत संतराज महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागताचे उत्तम प्रकारचे आयोजन निमसाखरहायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांनी व विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी केले. 
याप्रसंगी विद्यालयातील  मुलांनी व मुलींनी वारकरी वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यावेळी या पालखी सोहळ्यातील मुख्य आकर्षण रामलीला ठरले . श्री मारुतीराया व इतर सर्व वानर सेनेची भूमिका विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर रित्या वेशभूषा परिधान करून भूमिका बजावली होती. विद्यालयातील पेटी व तबलावादक शिक्षक  पोपटराव तोरणे सर, सोमनाथ ढोबळे, दत्तात्रय ढोबळे सर यांनी या कार्यक्रमाचे रंगत वाढवली. 


त्याचवेळी राम, सीता व लक्ष्मण यांची भूमिका विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर रित्या वटवली होती. विठ्ठल रुक्माई ,ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम, मुक्ताई, एकनाथ, सोपान काका, गोरोबाकाका, यांच्या वेशभूषा करून काही विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं.  अनेक मुलींनी तुळशीच्या कुंड्या घेऊन सहभागी झाल्या. अत्यंत नेत्र दीपक सोळा पाहून सर्वांचे मन, हृदय आनंदाने भरून गेले.. 
 कनिष्ठ  महाविद्यालयातील व हायस्कूल मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहकार्य केले. सौ आशा पर्वते मॅडम व स्वप्नाली पाटील मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.  विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रणवरे सर पर्यवेक्षक मधुकर खरात सर विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे सर व संस्था पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे मनःपूर्वक कौतुक करून अभिनंदन केले सर्व ग्रामस्थांनी देखील सर्व शाळकरी विद्यार्थ्यांचे विविध वेशभूषा परिधान केल्याबद्दल व या पालखी सोहळ्याचे स्वागत केल्याबद्दल सर्व शिक्षक बंधू भगिनींचे व विद्यार्थ्यांचे देखील खूप कौतुक केले. आपल्याच विद्यालयातील इयत्ता नववीचा विद्यार्थी उमेश सोमनाथ ढोबळे आपल्या हलगी वादनाने अनेक वारकऱ्यांची मने जिंकली. अत्यंत नयनरम्य सोहळा पाहून सर्वजण प्रसन्न व आनंद झाले होते.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*