गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित* *एल.जी. स्पोर्ट चे उद्घाटन*
इंदापूर : पळसदेव-(ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा शिक्षणाचे ज्ञान वृध्दिंगत व्हावे या उद्देशाने एल.जी. स्पोर्ट चे उद्घाटन दि. 12 जुलै 2024 रोजी करण्यात आले.
शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी जागृती व्हावी तसेच *खेळाद्वारे सुदृढता* हा केंद्रबिंदू ठेवून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक सुदृढता व आरोग्य संपन्न जीवनाचे महत्त्व बिंबवण्यासाठी या क्लबचे उद्घाटन करण्यात आले आहे अशी माहिती मुख्याध्यापक श्री राहुल वायसे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी एस. के. रेम्बो पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. भारती सातव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व भविष्यात खेळामध्ये शाळेचे नाव लौकिक करू अशी ग्वाही दिली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष आ. हनुमंत बनसुडे, डॉ.शांताराम सातव ,कार्याध्यक्ष नंदाताई बनसुडे,प्रिन्सिपल वंदना बनसुडे,सचिव नितीन बनसुडे ,सर्व विभागाचे विभाग प्रमुख ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मदने यांनी केले.
Comments
Post a Comment