चेतना इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सरडेवाडी येथे पालखी सोहळा उत्साहात.
इंदापूर (सरडेवाडी): चेतना इंटरनॅशनल स्कूल येथे दि. 13/07/2024 रोजी पालखी सोहळ्याच्या आयोजन करण्यात आली होते.
या कार्यक्रमास उपस्थित चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे , सचिव विलास भोसले , खजिनदार सोमनाथ माने तसेच चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रिन्सिपल निकिता माने सुधीर करगळ सर, उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली सुतार यांनी केले. सर्वप्रथम मुलांनी दिंडी परिक्रमा घेतली त्यानंतर नामघोषणाच्या गजरामध्ये मोठ्या प्रमाणावर रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आनंदी उत्सवामध्ये सहभाग घेतला व नाचत नाचत हरिनामाचा जप करत पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर छोट्याशा चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अभंग गवळण पोवाडे तसेच संतांचे महत्त्व व आषाढी वारीचे महत्त्व सांगितले तसेच कॅम्पसचे इंचार्ज सुधीर करगळ सर यांनी पालखी सोहळ्याचे महत्त्व पटवून दिले. या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून अकरावी वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले प्रिन्सिपल निकिता माने मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. टाळ ,मृदंग, विना ,पालखी मोठ्या जल्लोषात पांडुरंगाच्या नामघोशात विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला तसेच चेतना फाउंडेशन मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले.
अशाप्रकारे या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता पसायदानाने केली.
Comments
Post a Comment