अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूरच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.
इंदापूर: दि. २० जुलै २०२४ रोजी अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.श्री.अनिल शिर्के तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगरसेवक पोपट शिंदे , मराठा सेवा संघाचे प्रमुख .प्रमोद देशमुख ,उदयसिंह भोसले , आनंद रेडेकर , युवा उद्योजक राहुल गुंडेकर, .धनाजी ननवरे, .प्रतिक झोळ, संतोष जाधव, धीरज सूर्यवंशी, प्रवीण वानी, पत्रकार तात्याराम पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजची विद्यार्थीनी श्रेया यशवंत कुलकर्णी आणि प्रतिक्षा शरद खेडकर यांनी केले. तसेच डॉ.अनिल शिर्के यांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कॉलेज चे अध्यक्ष .सागर माणिक जाधव सर आणि . संतोष संजय जाधव यांच्या हास्ते सत्कार करण्यात आला.
तसेच अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप ग्रूप ऑफ कॉलेज च्या वतीने डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचा शुभम धनाजी भरणे आणि डिप्लोमा इन रेडिओलॉजी अँड इमेजिंग टेक्नॉलॉजीचा रोहित राजू राजगुरू, प्रदीप दत्तात्रय काळे, नवाज सरदार घाटवाले, सूरज दत्तात्रय जगताप , सौरभ गणपत चलवादे या विद्यार्थ्यांचे अभिनंदनपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेज इंदापूर सर्व शिक्षकेतर स्टाफ यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभाचा सोहळा पार पडला
Comments
Post a Comment