बांडेवाडीत रंगला बालवारकरी पालखी सोहळा.*पालखीत वृक्षाची मिरवणूक काढत वृक्ष संवर्धनाचा प्रसार.**पालकांनी जागोजागी बालदिंडीचे स्वागत करत विठ्ठल रखुमाईचे मनोभावे पुजन केले.**मुलांसाठी पोहे , जिलेबी , लाडू , बिस्कीट , चॉकलेट , खिचडी , केळी वाटप.**नाती सोबत आजी फुगडी खेळण्यात दंग.*

इंदापूर:(बांडेवाडी) दि 13 आषाढी वारी औचित्य साधुन सालाबादप्रमाणे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी बांडेवाडी यांचे संयुक्तपणे बांडेवाडी परिसरात बाल वारी , वृक्ष दिंडी , पालखी मिरवणूक , विठ्ठल रखुमाई पुजन संपन्न झाले.
       यावेळी शाळा समिती अध्यक्ष बापू राहिगुडे , संतोष डोंगरे , सुजित काळे यांचे हस्ते पुजन करून पालखी प्रस्थान झाले. *जागोजागी महिलांनी विठ्ठल रखुमाई पुजन करत दर्शन घेतले. मुलांनी झाडे लावा झाडे जगवा घोषणा दिल्या.* प्रियंका बांडे , अनिता बांडे , तृप्ती बांडे , अर्चना बांडे , सुजित काळे , मिलिंद बांडे , यांनी मुलांसाठी पोहे , जिलेबी , बिस्कीट , केळी वाटप केले. 
         *रामकृष्ण हरि , जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई भजन म्हणतं आजी सोबत नातीने , महिलांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.*
यावेळी वारकरी वेषातील मुले , टाळ , मृदंग , तुळस घेतलेले मुली लक्ष वेधून घेत होत्या. *अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले व शाळेच्या उपशिक्षिका कांचन रणपिसे ,  मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी पालखी सोहळ्याचे संयोजन केले.*

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*